जोधपूर / नाशिक : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत याच्यासह 14 संशयीतांवर शनिवारी नाशिक जिल्ह्यात फसवणुकीच्या गुन्ह्यात दाखल झाला आहे. नाशिक येथील सुशील बालचंद्र पाटील यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दिली होती. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या ओळखीचा हवाला देत गुजरात काँग्रेसचे नेते सचिन वालेरा यांनी आपल्यावर प्रभाव पाडल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पाटील यांनी केलेल्या तक्रारीत म्हणले आहे की, वलेरा यांनी सांगितले की, ते अभिक अॅडव्हर्टायझिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत राजस्थान सरकारसाठी काम करतात. त्यांनी पाटील यांना मोठा परतावा आणि सरकारी कराराचे आश्वासन दिले त्यामुळे पाटील यांनी एकूण 3.93 कोटी रुपये विविध 13 बँक खात्यांत स्लीपिंग पार्टनर म्हणून गुंतवले, त्यांचा सहभाग व्यवसायाला भांडवल पुरवण्यापुरताच मर्यादित होता. पण वलेरा यांनी परताव्याचे वचन दिल्याप्रमाणे त्यांना 19 कोटी रुपये मिळणे अपेक्षित होते. त्यांनी रकमेवरील व्याजासह 6.8 कोटी रुपयांची फसवणूक केली. वैभव गेहलोत हे देखील त्यांच्यासोबत काम करत होते, असे वलेरा यांनी सांगितले होते. मात्र, मी पैसे वापस मागण्यासाठी त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी मला पैसे देणे बंद केले. तसेच जेव्हा मी त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा वलेरा म्हणाला, 'मी तुमचे वैभवजींशी बोलणे करुन देतो' आणि त्याने एकदा व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलद्वारे माझी त्यांच्याशी ओळख करून दिली, पाटील म्हणाले. वैभवने मला काळजी करू नका, आम्ही सगळे एकत्र आहोत तुमचे पैसे परत मिळतील," असे सांगितले होते.