नाशिक - आगामी नगरपंचायती निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात आगामी नगरपंचायती निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भुजबळ फार्म कार्यालयात आढावा बैठक बोलवण्यात आली होती. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या तयारीला लागा, भुजबळांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश
आगामी नगरपंचायती निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात लवकरच कळवण, निफाड, चांदवड, देवळा, दिंडोरी, पेठ, सुरगाणा या नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा राष्ट्रावादी कॉंग्रेस पार्टीची बैठक मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थित पार पडली. यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी सर्व नगरपरिषदांचा आढावा घेऊन पक्षाची ताकद वाढवून नगरसेवकांची संख्या कशी वाढवण्यासाठी कंबर कसण्याचे निर्देश दिले आहेत.
दिंडोरी, पेठ नगरपंचायत निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, निफाड नगरपंचायतीची जबाबदारी आमदार दिलीप बनकर यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच कळवण, सुरगाणा नगरपंचायतीची जबाबदारी आमदार नितीन पवार यांच्याकडे, तर चांदवड-देवळा नगरपंचायत निवडणुकीची जबाबदारी जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड यांना देण्यात आली आहे.
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पगार, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ.सयाजी गायकवाड, निफाड तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, कळवण तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शहराध्यक्ष जितेंद्र पगार, देवळा तालुकाध्यक्ष यशवंत शिरसाठ, शहराध्यक्ष जितेंद्र आहेर, पेठ तालुकाध्यक्ष दामु राऊत, आदी उपस्थित होते.