महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Sadan Statue : सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवींचा पुतळा महाराष्ट्र सदनातून हटवला, विरोधक आक्रमक - undefined

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे महाराष्ट्र सदनातून हटविण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. हे दुष्कृत्य अतिशय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र सदन
महाराष्ट्र सदन

By

Published : May 29, 2023, 10:22 AM IST

Updated : May 31, 2023, 3:45 PM IST

नाशिक: दिल्लीतील महाराष्ट्र सदनात पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी केली गेली. या कार्यक्रमासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवण्यात आला. याप्रकरणावरुन राज्यातील विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक आहिल्यादेवी यांचा पुतळा हटवण्यावरुन छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ यांची सरकारवर टीका : नवी दिल्लीमधील महाराष्ट्र सदन येथे विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. मुख्य कार्यक्रमाच्यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे मध्ये येऊन म्हणून ते हटवण्यात आले. तेथील बाजूला असलेल्या एका घुमटाकार जागेत ठेवण्यात आले होते. कार्यक्रम झाल्यानंतर हे दोन्ही पुतळे पुन्हा जागेवर ठेवण्यात आली होती. दरम्यान, याबाबत निषेध व्यक्त करत छगन भुजबळ यांनी तिखट प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्र सदनात झालेल्या विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती कार्यक्रमाला आमचा विरोध नाही. मात्र या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सदनात असलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्याचे दुष्कृत्य करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची देखील उपस्थिती होती हे अतिशय दुर्दैवी आहे. - राष्ट्रवादी कांँग्रेस नेतेछगन भुजबळ

हीन दर्जाच्या मानसिकतेचे नवल :ज्या सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी शेणगोळे सहन करून मोठा त्याग केला. ज्या अहिल्यादेवींनी स्वकर्तृत्वाच्या जोरावर आदर्श राज्यकारभाराचा वस्तुपाठ घालून दिला. त्यांचेच पुतळे या सरकारला सहन होईना. या लोकांच्या बुद्धीची कीव येते, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली. आमचा सावरकरांच्या कार्यक्रमास विरोध नाही,पण महापुरुषांचे पुतळे हटवून तुम्ही दाखविलेल्या हीन दर्जाच्या मानसिकतेचे नवल वाटत असल्याचेही छगन भुजबळ म्हणाले.

महाराष्ट्र सदन

आमदार रोहीत पवारांची टीका :राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनीही या प्रकारावरुन राज्य सरकारवर ट्विट करुन टीका केली आहे. दरम्यान सदनात झालेल्या या प्रकरावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र सदनात काय घडले याची माहिती घ्यायला हवी. कारण हा संवेदनशील विषय असल्याचे सामंत म्हणाले. आम्ही सगळ्या महापुरुषांचा आदर करतो, त्यामुळे याची अधिक माहिती न घेता यावर बोलणे योग्य नसल्याचे सामंत म्हणाले.

महाराष्ट्र सदन

सावित्रीबाई फुलेंनी सुरू केली होती मुलींची शाळा : स्वातंत्र्याच्या आधी भारतात महिलांना दुय्यम स्थान होते. महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. 18 व्या शतकात मुली शाळेत गेल्या तर त्याला पाप समजले जात होते. अशा परिस्थितीत सावित्रीबाई फुले यांनी मुलींची शाळा पुण्यात सुरू केली होती. मुलींना शिकण्यासाठी त्या शाळेत जेव्हा जात असायच्या तेव्हा त्यांच्या अंगावर लोक शेण फेकत. दररोज होणाऱ्या या त्रासाल कंटाळून सावित्रीबाईंनी कधी आपले समाज सुधारण्याचे काम बंद केले नाही. आपले पती ज्योतिबा फुले यांच्यासोबत मिळून सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये शाळा सुरू केली होता. त्या दोघांचे लग्न बाल वयात झाले होते. लग्नानंतर त्या पुण्यात आल्या. तेव्हा त्या अशिक्षित होत्या. पण त्यांना शिकण्याची आवड होती. हे पाहून ज्योतिबा फुले यांनी त्यांना शिकवले. शिक्षिका होण्यासाठी सावित्रीबाई यांनी अहमदनगर आणि पुण्यात प्रशिक्षण घेतले होते.

सामाजिक एकात्मतेसाठी काम करणाऱ्या आहिल्याबाई होळकर : अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी झाला होता. अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या जामखेड तालुक्यामधील चौंडी गावात राहणाऱ्या एका धनगर कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. माणकोजी आणि सुशिलाबाई शिंदे असे त्यांच्या आई-वडिलांचे नाव होते. त्यांच्या वडिलांनी आहिल्याबाईचे जीवन घडविण्यात मोठे योगदान दिले आहे. होळकर घराण्याचे संस्थापक राजर्षी मल्हारराव होळकरांचा मुलगा खंडेराव यांच्या आहिल्याबाई यांचा विवाह झाला होता. त्यांचा विवाह झाला तेव्हा त्या 8 वर्षाच्या होत्या तर खंडेराव हे 12 वर्षांचे होते. आहिल्याबाई यांच्या सासऱ्यांनी त्यांना लिहिणे वाचणे, गणित सोडवणे, युद्ध कला, राजकरणाचे डावपेच अशा गोष्टी शिकवल्या होत्या. सासरे, पती, मुलगा यांचा निधनानंतर आहिल्याबाई डगमगल्या नाहीत. त्यांनी नेटाने राजकारभार चालवला. धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, बंधुता ,समता या तत्त्वांवर त्यांनी राज्य चालवले होते. आहिल्याबाई यांनी मंदिराप्रमाणे, मशिदी, दर्गे, विहार बांधली आहेत. स्वत: ताच्या मुलीचा एका आंतरजातीय विवाह त्यांनी लावून दिला होता.

हेही वाचा -

  1. Chhagan Bhujbal on Sharad Pawar Resign : शरद पवार यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला जाईल - छगन भुजबळ
  2. Ban Indic tales : इंडिक टेल्स वेबसाईटविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, पोलीस आयुक्तांकडे कारवाईची मागणी
  3. Ahilya Devi Holkar statue :अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त स्त्री सन्मान कार्यक्रम, पुतळा हलवल्याच्या वादानंतर सरकारचा निर्णय
Last Updated : May 31, 2023, 3:45 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details