नाशिक - कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी येथील विपश्यना केंद्रातील पुढील सत्र बंद ठेवण्याचे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
इगतपुरील्या विपश्यना केंद्रातील पुढील सत्र बंद ठेवा, भुजबळांचे आदेश - कोरोना विषाणू रुग्ण
चीनमध्ये कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. तसेच अनेक देशात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. भारतात देखील काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकार कडून ठोस उपाय योजना करण्यात येत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली. शहरात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांना येण्यास मज्जाव करणे आवश्यक आहे. तसेच खासगी रुग्णालयांनी परदेशातून आलेल्या रुग्णांची माहिती देणे बंधनकारक आहे. अशी माहिती न देणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. तसेच जिल्ह्यातील सर्व हॉटेलला परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती देणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. मात्र, आतापर्यंत शहरात बाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक आरती सिंग उपस्थित होते.