निफाड ( नाशिक) - कांदा जरा महाग झाल्याबरोबर व भाव वाढल्यावर आयकर विभागाच्या धाडी पडायला सुरुवात होते. जेव्हा कांदा व टोमॅटो फेकून दिले जातात तेव्हा कुठे जातात ही लोकं. शेतकऱ्यांना काही पैसे मिळायला लागले की, आशा धाडी पडायला सुरवात होते, अशी टीका पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय संस्थांवर केली आहे. भुजबळांनी निफाड येथे वन उद्यान उदघाटन प्रसंगी बोलत होते.
संजय काका पाटील यांच्या वक्तव्य बद्दल भुजबळ म्हणाले की, यांचे म्हणणे खरे असून त्यांच्या म्हणण्याला माझा पाठिंबा आहे. कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने धाडी घातल्या असून यात कांदा व्यापाऱ्यांकडे सापडलेले २५ कोटी रुपये जप्त केले आहेत. याबद्दल भुजबळ म्हणाले की, कांदा जरा महाग झाल्याबरोबर भाव वाढल्यावर आशा धाडी पडायला सुरुवात होते. जेव्हा कांदा व टोमॅटो फेकून दिले जातात तेव्हा कुठे जातात ही लोके. शेतकऱ्यांना काही पैसे मिळायला लागले की, आशा धाडी पडायला सुरुवात होते.
नाशिक व पिंपळगाव बसवंत येथील कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने छापे टाकले. या छाप्यात तीन दिवस सलग तपासणी करण्यात घेऊन या कारवाईत सुमारे 26 कोटी रुपयांची रोख रक्कम व तसेच शंभर कोटीहून अधिक रक्कमेची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली असल्याचं आयकर विभागाच्या सूत्रांनी सांगितलं.
हे ही वाचा -..त्यामुळे चंद्रकांत पाटलांच्या विधानांना उत्तर देणे आता शक्य होणार नाही - मंत्री जयंत पाटील
नोटा मोजायला 18 ते 19 तास -
आयकर विभागाच्या पथकाने जप्त केलेली रोख रक्कम मोजण्यासाठी 80 ते 90 अधिकारी-कर्मचारी नाशिक व पिंपळगाव मधील काही बँकांमध्ये तब्बल 18 ते 19 तास 26 कोटींची रक्कम मोजत होते. यात 500,100, 2000 च्या नोटा सर्वाधिक होत्या. महिन्याभरात तब्बल 32 कोटींची रक्कम नाशिक आयकर विभागाच्या अन्वेषण विभागाने वेगवेगळ्या कारवाईत जप्त केली आहे.
आयकर विभागाचे सलग चार दिवस छापे -
नाशिकमधील तीन ते चार व पिंपळगावच्या सात ते आठ व्यापाऱ्यांकडे एकाच वेळी छापे टाकण्यात आले होते. याकारवाईत आयकर विभागाचे दीडशे ते दोनशे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस व्यापाऱ्यांच्या कार्यालय,गोडाऊन,निवासस्थानी तसेच त्यांच्या बँक खात्यांची तपासणी केली. या कारवाईत आयकर विभागाला अनेक महत्वाची माहिती हाती लागली असल्याचं सूत्रांनी सांगितले. गेल्या काही वर्षातील आयकर विभागाची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. मात्र, या धाडसत्राने नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
काय म्हणाले होते खासदार संजय काका पाटील ?
मी भाजपाचा खासदार आहे, त्यामुळे माझ्या मागे ईडी लागणार नाही, असे भाजपा खासदार संजयकाका पाटील म्हणाले होते. सांगलीच्या विटा येथे आयोजित कार्यक्रमात खासदार संजयकाका पाटील यांनी हे वक्तव्य केले होते. अनेक स्थानिक नेत्यांनी कर्ज आणि संपत्तीवरून केलेल्या भाष्यावरून संजयकाका पाटील यांनी हे विधान केले होते.