महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Chhagan Bhujbal : मला एकट्याला टार्गेट केलं जातंय - छगन भुजबळ - छगन भुजबळ नाशिक पत्रकार परिषद

Chhagan Bhujbal In Nashik PC: मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण (Reservation to Maratha community from OBC quota) देण्यास ओबीसी नेत्यांकडून विरोध होत असल्याने छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) मराठा समाजाच्या टार्गेटवर आले आहेत. (Maratha reservation Issue) अलिकडेच मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर टीका केली. (OBC leader Chhagan Bhujbal) यावर आज (सोमवारी) नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्याला जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असल्याचे बोलले आहे. (Chhagan Bhujbal on target)

Chhagan Bhujbal In Nashik PC
छगन भुजबळ

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 2, 2023, 6:11 PM IST

मराठा नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या टार्गेटवर भुजबळांचे प्रत्युत्तर

नाशिकChhagan Bhujbal In Nashik PC: मनोज जरांगे पाटलांनी ओबीसी नेते छगन भुजबळांवर निशाणा साधल्यानंतर भुजबळांनी त्यांना प्रतिउत्तर दिलं. मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण देऊ नये हे माझं नाही तर सगळ्यांचं मत आहे. गेले 35 वर्षे मागासवर्गीयांसाठी लढणं हा माझ्या जीवनाचा भाग आहे; पण मला यात एकट्याला टार्गेट केलं जातंय असंही यावेळी छगन भुजबळ यांनी म्हटलं. ते आज (सोमवारी) नाशिकला असता पत्रकारांशी बोलत होते.

भुजबळांना बळ द्यायचं काम करू नये:मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील दौरे सुरू केले आहे. यावेळी त्यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधला आहे. मराठ्यांनी भुजबळांना बळ द्यायचं काम करू नये, असं आवाहन जरांगे पाटलांनी मराठा समाजाला केलं आहे. यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, इशारे मला द्यायचे असतील तर जरूर द्या; मात्र मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण न द्यावं हे माझं नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, शरद पवार, अशोक चव्हाण, नाना पटोले यांचं सगळ्यांचं मत आहे. मी गेले 35 वर्षे मागासवर्गीयांसाठी लढणं हा माझ्या जीवनाचा भाग आहे; पण मला यात एकट्याला टार्गेट केलं जातंय असंही यावेळी छगन भुजबळ यांनी म्हटलं.


मनोज जरांगे पाटलांनी काय म्हटले?मनोज जरांगे पाटील यांनी नांदेड येथे मराठा बांधवांसाठी जाहीर सभा घेतली. व्यासपीठावर बोलताना ओबीसी नेत्यांना उपकाराची परतफेड करण्याचे त्यांनी आवाहन केले. त्याच सोबत त्यांनी व्यासपीठावर येताच पुन्हा मंत्री छगन भुजबळांवर टीका देखील केली. गेल्या 75 वर्षांपासून मराठा समाजाने ओबीसी नेत्यांची प्रतिष्ठा, मान, इज्जत वाढवली. आम्ही मराठ्यांनी तुमच्यावर उपकार केलेत. आमच्या बापजाद्यांनी तुमची प्रतिष्ठा वाढवली. आता आम्हाला आरक्षण द्या आणि उपकाराची परतफेड करा, असंही आवाहन मनोज जरांगे पाटलांनी यावेळी केलं.

वाघनखे आणण्यासाठी विरोध नको:लंडन मधील म्युझियममध्ये असलेली वाघनख महाराष्ट्रातील असतील हे नक्की आहे. महाराजांनी ती वापरली की नाही यावर लोक चर्चा करत आहेत. परंतु, ज्या अर्थी ही वाघनख एवढी वर्षे सांभाळून ठेवली असतील तर काही तरी त्या वाघनखांचे महत्त्व असेल. त्यामुळे ते आणण्यासाठी एवढा विरोध करण्याचे कारण नाही असं भुजबळ यांनी म्हटलं.

हेही वाचा:

  1. MNS Loksabha Election २०२४ : लोकसभेसाठी 'मनसे'ची प्लॅनिंग; 'या' दोन मतदारसंघांवर नजर?
  2. Gandhi jayanti 2023 : राष्ट्रपती, पंतप्रधान मोदींसह दिग्गजांनी बापूंना वाहिली श्रद्धांजली, पंतप्रधान म्हणाले...
  3. Aaditya Thackeray Criticizes BJP : माझा तुम्ही 'बाळ' असा उल्लेख केला याचा अभिमान; आदित्य ठाकरेंची भाजपावर टीका

ABOUT THE AUTHOR

...view details