महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Chhagan Bhujbal Nashik : 'ईडीच्या धाकापोटीच अनेक जण भाजपासोबत' - ईडीच्या धाकापोटीच अनेकजण भाजपात

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची संघटना टिकावी, अशी प्रतिक्रिया माजी पालकमंत्री छगन भुजबळ ( MLA Chhagan Bhujbal ) यांनी दिली आहे. भुजबळांनी आज (गुरुवारी) पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ते बोलत होते. निश्चितच ईडीच्या धाकापोटी भाजपासोबत अनेक जण गेले असल्याचेही यावेळी भुजबळांनी सांगितले.

छगन भुजबळ
छगन भुजबळ

By

Published : Jul 7, 2022, 3:29 PM IST

Updated : Jul 7, 2022, 3:37 PM IST

येवला ( नाशिक ) -अनेक जण ईडीच्या धाकापोटीच भाजपासोबत गेले असून नवीन स्थापन झालेल्या सरकारला माझ्या शुभेच्छा आहे. तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची संघटना टिकावी, अशी प्रतिक्रिया माजी पालकमंत्री छगन भुजबळ ( MLA Chhagan Bhujbal ) यांनी दिली आहे. भुजबळांनी आज (गुरुवारी) पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ते बोलत होते. ईडीच्या धाकापोटी भाजपासोबत अनेक जण गेले असल्याचेही यावेळी भुजबळांनी सांगितले.

प्रतिक्रिया देताना माजी मंत्री भुजबळ



'नवीन सरकारला माझ्या शुभेच्छा' : एखाद्या घराचा चांगला काम झाले तर आपण त्याला कसा आशीर्वाद देतो की नांदा सौख्यभरे तर त्याला काय म्हणतो का आपण लगेच डिव्हास घ्या. त्यामुळे नक्कीच राज्यात नवीन स्थापन केलेल्या सरकारला माझ्या शुभेच्छा असून नक्कीच जनतेचे प्रश्न मार्गी लावा अशी अपेक्षा आहे, असे भुजबळ म्हणाले.


'बाळासाहेब ठाकरे यांची संघटना टिकावी' : शिवसेना स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून मी शिवसेनेत होतो. नाशिकमधील अनेक शिवसेनेच्या शाखांचे मी उद्घाटन केले असून अनेक आमदारांना देखील मी शाखाप्रमुख म्हणून नेमले आहे. त्यामुळे ही संघटना संपावी असे तर कोणालाही वाटत नसून मला देखील वाटत नाही की ही संघटना संपावी. महाराष्ट्रात तर जर कोणाला वाटत असेल तर ठीक आहे. काही मतभेद असू शकतील काही मते पटतील काही पटणार नाही. मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली ही शिवसेनेची संघटना संपावी, असे तरी मला वाटत नाही, असे भुजबळ म्हणाले.

हेही वाचा -'संदीपान भूमरेंनी मंत्री झाल्यावर माझ्यासमोर लोटांगण घातलं.. CCTV फुटेज देतो - संजय राऊत

Last Updated : Jul 7, 2022, 3:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details