नाशिक- शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी केली, तेव्हा वाघ झोपला होता का? शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, तेव्हा वाघ झोपला होता का? असे सवाल उपस्थित करत छगन भुजबळ यांनी शिवसेनेवर टीका केली. तसेच निवडणुका आल्या की वाघ जागा होतो, असा टोलाही लगावला.
छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ खासदार सुप्रिया सुळेंची येवल्यात प्रचार सभा घेण्यात आली. त्यावेळी भुजबळ आणि सुळेंनी सेना-भाजपवर तोफ डागली.
छगन भुजबळांची येवल्यामध्ये सभा हेही वाचा -त्र्यंबकेश्वर तालुक्यात जनावरांच्या गोठ्यात आढळला मृत बिबट्या
यावेळी सुळे म्हणाल्या, शिवसेना म्हणत आहे, 10 रुपयात थाळी देणार. पण, ती कशी देणार, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. तुमचा शेव वडापाव पण 10 रुपयात मिळत नाही, तर 10 रुपयात थाळी कशी देणार. तर दुसरा म्हणतो 5 रुपयात थाळी देतो. फक्त गाजरांचा पाऊस चालू आहे. हे फडणवीस नाही फसनवीस सरकार आहे, अशी टीका सुळे यांनी केली.
हेही वाचा -मुख्यमंत्र्यांसारख्या दत्तक बापाची नाशिकला गरज नाही, पवारांचा निशाणा