नाशिक- भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या यादीत एकनाथ खडसे यांचे नाव न आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता यावर खडसे काय निर्णय घेणार, यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना खडसे राष्ट्रवादीत येणार का? विचारले असता, भुजबळ यांनी खडसे जर भाजपमधून राष्ट्रवादीत आले तर त्यांचे स्वागतच आहे, असे त्यांनी सांगितले.
छगन भुजबळ, राष्ट्रवादी नेते हेही वाचा - उमेदवारी जाहीर न केल्याने आमदार बाळासाहेब सानप नाराज
नाशिकच्या इगतपुरी मतदारसंघातून आघाडीकडून काँग्रेसच्या हिरामण खोसकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ देखील उपस्थित होते. यावेळी खोसकर यांच्याबद्दल वातावरण चांगलं असून पुन्हा आघाडीचाच उमेदवार निवडून येईल. भाजपने बहुजनांवर अन्याय केला आहे. राज्यात सरकारविरुद्ध नाराजी असून आघाडीची सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त भुजबळ यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - नाशकात बाळासाहेब सानपांच्या उमेदवारीवर टांगती तलवार, 21 नगरसेवकांचे राजीनामे
ठाकरे घराण्याने आजपर्यंत अगदी माझ्यासहीत अनेक जणांना नगरसेवक, महापौर बनवले. मात्र, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे कधीच रिंगणात उतरले नव्हते. आदित्य ठाकरे यांच्या निमित्ताने महाराष्ट्रात एक तरुण नेता पुढे येतोय. त्यामुळे आदित्य ठाकरेंना माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून शुभेच्छा. मनसेने आदित्य विरोधात उमेदवार दिला नाही, हा निर्णय योग्यच आहे. शेवटी ठाकरे घराणे एकच असल्याचे भुजबळ यांनी सागितले.