मुंबई - बांगलादेश किंवा पाकिस्तानच्या घुसखोरांना हाकलण्याचा कार्यक्रम आजचा नाही तर २० वर्षांपूर्वीचा असल्याचे वक्तव्य नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. घुसखोऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग कसा काढायचा त्याकडे भारत सरकारने लक्ष द्यावे असेही भुजबळ म्हणाले. तसेच लोकशाहीमध्ये सगळ्यांना मोर्चा काढायचा, आपापले मत मांडण्याचा अधिकार असल्याचे भुजबळ म्हणाले.
'लोकशाहीत मोर्चा काढायचा अधिकार सर्वांना, घुसखोरांच्या प्रश्नावर केंद्र सरकारने लक्ष द्यावे' - लोकशाहीत मोर्चा काढायचा अधिकार सर्वांना
बांगलादेश किंवा पाकिस्तानच्या घुसखोरांना हाकलण्याचा कार्यक्रम आजचा नाही तर २० वर्षांपूर्वीचा असल्याचे वक्तव्य नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. घुसखोऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग कसा काढायचा त्याकडे भारत सरकारने लक्ष द्यावे असेही भुजबळ म्हणाले.

आजच्या या मोर्चामागे कोणीही असले तरी काही फरक पडत नाही. लोकशाहीमध्ये सगळ्यांना इकडून तिकडे, तिकडून इकडे जाण्याचा अधिकार आहे. पण आमच्या त्यांना शुभेच्छा असल्याचे भुजबळ म्हणाले. छगन भुजबळ हे फाळके स्मारक येथे पाहणी दौऱ्यावर आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आज मुंबईत मोर्चा काढण्यात आला आहे. देशात असलेले बांगलादेश आणि पाकिस्तानमधील घुसखोरांना बाहेर काढण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा निघत आहे. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, लोकशाहीमध्ये मोर्चा काढायचा सर्वांना अधिकार आहे.
TAGGED:
छगन भुजबळ न्यूज