महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मागच्या सरकारनं सुडबुद्धीनं नाशिकची विकासकामे अडवली' - पालकमंत्री छगन भुजबळ फडणवीस सरकारवर आरोप

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज (शुक्रवार) नाशिकच्या गंगापूर धरणावर बांधलेल्या बोट क्लबची पाहणी केली. यावेळी भुजबळांनी तत्काळ बोट क्लबचे काम सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

chhagan bhujbal comment on BJP in Nashik
पालकमंत्री छगन भुजबळ

By

Published : Feb 7, 2020, 8:31 PM IST

Updated : Feb 7, 2020, 9:25 PM IST

नाशिक -मागच्या सरकारने सुडबुद्धीने नाशिकची विकासकामे अडवून ठेवल्याचा आरोप नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला. भुजबळांनी आज (शुक्रवार) नाशिकच्या गंगापूर धरणावर बांधलेल्या बोट क्लबची पाहणी केली. यावेळी माजी पर्यटनमंत्र्यांनी येथून अनेक बोटी नेल्याचा खुलासा अधिकाऱ्यांनी भुजबळांसमोर केला. या बोट तुम्हाला दान दिल्या, असे म्हणत तत्काळ बोट क्लबचे काम सुरू करण्याचे आदेश भुजबळांनी अधिकाऱ्यांना दिले.

छगन भुजबळांच्या काळात उभारण्यात आलेल्या बोट क्लब, कलाग्राम, मनोरंजन पार्क या प्रकल्पांची पाहणी भुजबळांनी अधिकाऱ्यांसमवेत केली. यावेळी बोट क्लबसाठी आणलेल्या महागड्या बोट अक्षरश: धूळ खात पडल्याचे बघून भुजबळांचा अधिकाऱ्यांवर पाराच चढला. मागच्या सरकारने सुडबुद्धीने नाशिकचा विकास होऊ दिला नसल्याचा आरोप भुजबळांनी केला.

छगन भुजबळांनी केली गंगापूर धरणावर बांधलेल्या बोट क्लबची पाहणी

दरम्यान, सगळ्या कामांची पाहणी झाल्यानंतर तत्काळ हे काम पूर्ण करून नाशिककरांसाठी खुले करण्याचे आदेश भुजबळांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, गंगापूर धरणावर सी प्लेनचा देखील प्रयोग यशस्वी झाला असून, त्याबाबत देखील लवकरच निर्णय घेणार असल्याचे भुजबळांनी सांगितले. 2014 साली उभारण्यात आलेल्या बोट क्लबबाबत ५ वर्षात काहीही काम झाले नाही. उलट या बोट क्लबसाठी लागणारा देखभाल निधी देखील मागच्या सरकारने दिला नसल्याची तक्रार अधिकाऱ्यांनी भुजबळांकडे केली. असे असले तरी पुढच्या काही दिवसातच हे प्रकल्प जोमाने सुरू करू, असेही भुजबळांनी स्पष्ट केले.

भाजपला मिशन कमळ लागू करू द्या

आमच्याकडे धनुष्यबाण आहे. किती वेळात बाण सोडायचा यासाठी घड्याळ आणि मजबूत हात पण असल्याचे भुजबळांनी सांगितले.

Last Updated : Feb 7, 2020, 9:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details