नाशिक : नाशिकमध्ये जगदंब क्रिएशन आयोजित छत्रपती संभाजी महाराज महानाट्याच्या पार्श्वभूमीवर ( Chhatrapati Sambhaji Maharaj Drama ) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज नाशिक येथील कार्यालयात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी महानाट्याबाबत माहिती देत या महानाट्याचे पहिले तिकीट छगन भुजबळ यांना ( Chhagan Bhujbal Bought first Ticket ) दिले. यावेळी हे पहिले तिकीट छगन भुजबळ यांनी खरेदी केले.
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांनी खरेदी केले छत्रपती संभाजी महाराज महानाट्याचे पहिले तिकीट - Chhagan Bhujbal Bought first Ticket
छत्रपती संभाजी महाराज महानाट्याचे पहिले तिकीट छगन भुजबळ यांनी खरेदी ( Chhatrapati Sambhaji Maharaj Drama ) केले. नाशिकमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांनी कार्यालयात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे तिकीट छगन भुजबळ यांना ( Chhagan Bhujbal Bought first Ticket ) दिले.
![Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांनी खरेदी केले छत्रपती संभाजी महाराज महानाट्याचे पहिले तिकीट Amol Kolhe Chhagan Bhujbal](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-17437514-1031-17437514-1673260704185.jpg)
इतिहास पुढे नेण्यासाठी आयोजन :महापुरुषांचा इतिहास पुढच्या पिढीकडे पोहचविण्यासाठी अशा स्वरूपातील महानाट्य अतिशय उपयुक्त आहे. नाशिक शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी छत्रपती संभाजी महाराज महानाट्य बघावे असे आवाहन त्यांनी केली. यावेळी डॉ.अमोल कोल्हे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
3 मजली सेट, घोड्यांचा ताफा २०० कलाकार :२१ ते २६ जानेवारी दरम्यान सायंकाळी ६ वाजता तपोवन येथील मोदी मैदानात 'शिवपुत्र 'संभाजी' हे महानाट्य सादर ( Amol Kolhe Chhagan Bhujbal ) होईल. १८ एकर परिसरात तीन मजली सेट, घोडे ताफा आणि सुमारे २०० कलाकारांचा संच असेल. मैदानी खेळ, गड-किल्ल्यांची माहिती, शस्त्रे यांची माहिती या ठिकाणी असेल. या महानाट्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून ते बलिदानापर्यंतचा इतिहास तीन तासांत सादर केला जाईल. दहा हजार प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था करण्यात आली आहे. बुक माय शो तसेच महाकवी कालिदास कलामंदिरासह इतर चार ठिकाणी तिकिटे उपलब्ध असतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे.