नाशिक - साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर कोजागरी पोर्णिमानिमित्त कावडयात्रा रद्द झाली आहे. तरीही शेकडो वर्षांच्या पंरपरेनुसार तृतीय पंथीयाचा छबिना उत्सव गडावर मोजक्याच तृतीयपंथीय गुरुंच्या उपस्थित पार पडला.
छबिना मिरवणूक

तृतीय पंथीय गटाचे गुरु आखिल भारतीय किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पायल नंदगीरीजी यांनी गडावर मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत छबिना मिरवणूक काढली. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ मानल्या जाणाऱ्या नाशिकच्या वणी येथील सप्तश्रृंगी देवीच्या गडावर शुक्रवारी तृतीय पंथीयांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात देवीचे पूजन करून साकडे घातले. यावेळी राज्यभरातील मंदिरे लवकरात लवकर उघडावीत, अशी मागणी तृतीयपंथीयांनी केली आहे. तसेच परंपरा खंडित होऊ नये, म्हणून मिरवणुकीसाठी परवानगी दिल्याबद्दल प्रशासनाचे देखील आभार मानले.
शेकडो वर्षांचीपरंपरा
कोजागरीनिमित्त दरवर्षी तृतीय पंथीयांची मोठ्या प्रमाणात गडावर गर्दी असते. यंदा कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गडावर नवरात्र उत्सव व कोजागरी पौर्णिमेचा उत्सव रद्द केला होता. मात्र तृतीय पंथीयांच्या यात्रेची म्हणजेच छबिन्याची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी मोजक्या पंधरा जणांना गडावर जाण्याची परवानगी देण्यात आली होती.