नाशिक - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महापालिकेने शहरातील रस्त्यावर औषध फवारणी सुरू केली आहे. आतापर्यंत 2200 किलोमीटरच्या रस्त्यावर फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तसेच, शासकीय इमारती निर्जंतुकीकरण करण्यासाठी विविध यंत्रांची मदत घेतली जात आहे.
कोरोना प्रसार रोखण्यासाठी औषध फवारणी, 2200 किलोमीटरच्या रस्त्याचे निर्जंतुकीकरण - corona effect
कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जारी केला आहे. नाशिक महापालिकेने शेतकऱ्यांच्या औषध फवारणीच्या ट्रॅक्टरच्या मदतीने शहरात औषध फवारणीची मोहीम हाती घेतली आहे.

कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जारी केला आहे. नाशिक महापालिकेने शेतकऱ्यांच्या औषध फवारणीच्या ट्रॅक्टरच्या मदतीने शहरात औषध फवारणीची मोहीम हाती घेतली आहे. मागील आठ दिवसात शहरातील 2200 किलोमीटरच्या रस्त्यावर सोडीयम हाइपोक्लोराइट औषधाची फवारणी केली जात आहे. ही फवारणी शहरातील 6 विभागात टप्याटप्याने कऱण्यात आली. यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंग आणि पॉझिटिव्ह व्हील्स यांच्या सहकार्याने विविध यंत्रांच्या मदतीने शहरातील उंच शासकीय इमारतीवर निर्जंतुकीकरणासाठी औषध फवारणी केली. आतापर्यंत 40 ते 50 फुटापर्यंत औषध फवारणी करणे शक्य झाले आहे. यात विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, पोलीस आयुक्त कार्यालय, जिल्हा न्यायालय आणि महानगरपालिकेच्या इमारतीचा समावेश करण्यात आला आहे.