महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nashik BJP Meeting: गुजरातमध्ये सलग पाचव्या वेळी भाजपाचे सरकार आले, त्या धर्तीवर महाराष्ट्रातही यश मिळवायचे आहे- चंद्रशेखर बावनकुळे - विधानसभा निवडणुका

2024 च्या लोकसभा -विधानसभा निवडणुकांची भाजपाने वर्षभर आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. शुक्रवार -शनिवार नाशिक मध्ये झालेल्या भाजपाच्या प्रदेश कार्यकारणी बैठकीत त्यासाठी रणनीती ठरवण्यात आली. शिंदे सेनेच्या मदतीने महाराष्ट्रात 45 खासदार व 200 हुन अधिक आमदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट पक्षाने घेतले आहे. त्यापैकी 150 आमदार एकट्या भाजपाचे असतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Nashik BJP Meeting
नाशिकमध्ये भाजपाची बैठक

By

Published : Feb 12, 2023, 12:51 PM IST

नाशिकमध्ये भाजपची बैठक

नाशिक :गुजरातमध्ये सलग पाचव्या वेळी भाजपाचे सरकार आले, त्या धर्तीवर महाराष्ट्रातही यश मिळवायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पक्ष संघटनाला खूप महत्त्व देतात. आपल्यालाही आगामी निवडणुकीसाठी राज्यात संघटन मजबूत करायचे आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक बुथवर 100 नवीन मतदारांची वाढ करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. ज्यामुळे पुढील 50 वर्ष भाजपाला कोणीही सत्तेपासून हटवू शकणार नाही, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. नाशिकमध्ये नुकतेच दोन दिवशीय भाजप कार्यकारिणीची बैठक पार पडली. भाजपची दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू होती.

बूथनिहाय जबाबदारी :प्रत्येक बुथवर 100 नवीन मतदार नोंद केंद्राच्या योजनांचे लाभार्थी 25 ते 30 लोकांकडून मोदी धन्यवादाचे पत्र लिहून घेणे व पाठवणे, 25 ते 30 युवा वॉरियर्स तयार करणे, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षातील 25 ते 30 जणांना भाजपात आणणे, फ्रेंड्स ऑल बीजेपी उपक्रम 25 ते 30 जणांना जोडणे याचा बुथनिहाय जबाबदारीमध्ये समावेश आहे. सोशल मीडियावर राहाल तर टिकाल, असा मंत्र फडणवीसांनी दिला.

सोशल मीडियाचा वापर, निधी अधिक वाढवणार : विरोधी पक्ष त्याद्वारे आपली प्रतिमा खराब करत आहेत, तुम्ही या मीडियाद्वारे केंद्र राज्य सरकारची विधायक कामे आग्रह पूर्ण जनतेपर्यंत पोहोचवा, म्हणजे पण विशेष म्हणजे 18 ते 30 वयोगटातील युवक मतदारांना सोशल मीडियाद्वारे आकर्षित करा. शिवसेना काँग्रेससोबत गेल्याने त्यांची दुखावलेली हिंदुत्ववादी मते भाजपकडे खेचून आणण्यावर भर असेल, आजवर कधीच न जिंकलेल्या मतदारसंघात भाजपाच्या राज्यसभा, विधान परिषद सदस्यांचा विकास निधी खर्च करून तेथील कामे प्राधान्य केली जाईल, असे महासचिव विनोद तावडे म्हणाले.

आगामी निवडणूकांसाठी भाजपाची मोर्चेबांधणी :आगामी लोकसभा एका वर्षावर येऊन ठेपल्या आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने देखील तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी योजना बनविली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मोदी सरकार आल्यापासून डिजिटल तंत्रज्ञानाने भारतातील प्रत्येक क्षेत्रात प्रभाव टाकला आहे. देशातील अनेक लाकांकडे मोबाईल आहे, हे लक्षात घेवून भारतीय जनता पक्ष सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रचार करणार आहे. भाजपणे या निवडणुकांसाठी रणनिती आखायला सुरूवात केली आहे.

हेही वाचा : Bhagat Singh Koshyari Controversies : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त कारकीर्दीवर एक दृष्टीक्षेप

ABOUT THE AUTHOR

...view details