महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकच्या मातीत युवा शेतकऱ्याने फुलली काश्मिरी सफरचंदाची बाग - चंद्रकांत ह्याळीज यांनी पिकवली सफरचंदाची बाग

सफरचंदाची बाग फक्त काश्मीरमध्ये पिकते, अशी अनेक शेतकऱ्यांची भावना आहे. याला बगल देत नाशिकच्या बागलाण तालुक्यातील चंद्रकांत ह्याळीज या युवा शेतकऱ्याने आपल्या शेतात सफचंदाची बाग फुलवली आहे. त्यामुळे अनेक अभ्यासू शेतकऱ्यांची पावले आता ह्याळीज यांच्या शेतीकडे वळत आहेत. विशेष म्हणजे चंद्रकांतने या बागेसाठी गुगलची मदत घेतली.

नाशिक
नाशिक

By

Published : Jun 16, 2021, 4:25 PM IST

नाशिक - डाळिंब बागांसाठी देशभरात नावाजलेल्या बागलाण तालुक्यातील शेतकर्‍याने काश्मीरच्या सफरचंदाची फळबाग लावून ती यशस्वीरित्या फुलवून दाखवली आहे. हा प्रयोग मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्यास बागलाणच्या मातीतील काश्मिरी सफरचंदाचा गोडवा चाखायला मिळणार आहे.

चंद्रकांत ह्याळीज- सफरचंद उत्पादक

सफरचंदाची बाग फुलवण्यासाठी गुगलचा आधार

बागलाण तालुक्यातील आखातवाडे येथील युवा शेतकरी चंद्रकांत ह्याळीजने हा अफलातून प्रयोग करुन दाखवला आहे. काश्मीर व्यतिरिक्त सफरचंद पिकतच नाही, अशी दृढ भावना अनेक शेतकऱ्यांमध्ये आहे. मात्र, चंद्रकांतने त्या भावनेला तढा दिला आहे. त्याने यासाठी गुगलच्या माध्यमातून काश्मीरच्या सफरचंद बागेची माहिती घेतली. त्यानुसार आपल्या शेतातच सफरचंदाची बाग फुलवली आहे.

हिमाचल प्रदेशच्या नर्सरीमधून मागवली रोपे

चंद्रकांतने हिमाचल प्रदेश येथील रजित बायोटेक नर्सरीमधून प्रायोगिक तत्त्वावर ५० रोपे मागवली. त्यानुसार, नर्सरीच्या संचालकांकडून सफरचंद लागवडीविषयी मार्गदर्शन घेतले. लागवड कधी करायची, पाण्याचे प्रमाण, तापमान, औषधे देण्याची पद्धत आदींबाबत योग्य असे मार्गदर्शन घेतले. यासाठी त्याने रजित बायोटेक नर्सरीचे मार्गदर्शन घेतले. सोशल मीडियावर सफरचंद शेतीची पोस्ट आल्यानंतर तालुक्यात अनेक अभ्यासू शेतकऱ्यांचे पाय चंद्रकांतच्या शेतातील सफरचंदाच्या बागेकडे वळाले आहेत.

स्थानिक शेतकऱ्यांना मिळाली प्रेरणा

योग्य नियोजनातून आज प्रायोगिक तत्त्वावर सफरचंद बाग फुलल्याने ह्याळीज कुटुंबीय व गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर सफरचंद शेतीची पोस्ट आल्यानंतर तालुक्यात अनेक अभ्यासू शेतकरी चंद्रकांतच्या शेतातील सफरचंदाच्या बागेची माहिती घेण्यासाठी येत आहेत. अवकाळी पाऊसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सफरचंद लागवडीतून नवीन प्रयोग यशस्वी झाल्यास आम्हीदेखील सफरचंद लागवड करणार असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

बागलाणच्या या युवा शेतकरी चंद्रकांतने प्रतिकूल परिस्थितीतही संशोधक वृत्तीतून फळशेतीत ऐतिहासिक क्रांती केली आहे. जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर सर्वच काही यशस्वी होते, असा आदर्शच चंद्रकांतने निर्माण केला आहे.

हेही वाचा -'शासकीय यादी मान्य करण्याचे राज्यपालांना बंधनकारक नाही'

ABOUT THE AUTHOR

...view details