नाशिक -नाशिकमध्ये चक्क पोलीस उप महानिरीक्षक यांच्या निवासस्थानातून ( Chandan Theft In AD. IG House ) चंदनाच्या झाडाची चोरी झाल्याची घटना घडली आहे. यामुळे चंदन चोरांनी पोलीस यंत्रणेला खुले आव्हान दिल्याची चर्चा पोलीस यंत्रणेत सुरू आहे.
चंदनाचे खोड कापून नेल्याचा प्रकार -
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पोलीस कर्मचारी अमोल बर्वे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर यांच्या निवासस्थानी कर्तव्यास आहे. रात्री चोराने बंगल्याच्या आवारात प्रवेश करत समोर 20 वर्ष जुन्या चंदन वृक्षाचे खोड कटरने कापून नेले. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर दुसऱ्या घटनेत सातपूर पोस्ट कार्यालयाच्या आवारातील चंदन वृक्षाची चोरी झाली आहे, याबाबत प्रमोद आहेर यांनी तक्रार दिल्यानंतर या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह अधीक्षकांच्या शासकीय निवासस्थानाजवळून रविवारी 13 फेब्रुवारीला पाच चंदनाची झाडे अज्ञात चोरट्यांनी चोरली. खोड कापून नेल्याचा प्रकार सकाळी उघड झाल्यानंतर शोधाशोध सुरू झाली. कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ यांच्या निवासस्थानातून पाच हजारांच्या चंदनाच्या खोडाची चोरी झाली.