महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकमध्ये सोनसाखळी चोरांचा सूळसुळाट; सीसीटीव्ही चित्रीकरणात दोन चोर कैद

मागील काही दिवसांपासून शहरातील विविध भागात महिलांच्या गळ्यातील दागिने चोरून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. आज (बुधवार) सकाळी शहरातील हिरावाडी, काठे गल्ली, तसेच गंगापूर रोड परिसरामध्ये मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार झाले.

सीसीटीव्ही चित्रीकरणात दोन चोर कैद

By

Published : Aug 28, 2019, 4:47 PM IST

नाशिक - शहरात मागील काही दिवसांपासून सोनसाखळी (चेन स्नॅचिंग) चोरांनी धुमाकूळ घातला आहे. शहरातील विविध भागात महिलांच्या गळ्यातील दागिने चोरून नेण्याचे प्रकार वाढले आहेत.

नाशिकमध्ये सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट
आज (बुधवार) सकाळी शहरातील हिरावाडी, काठे गल्ली, तसेच गंगापूर रोड परिसरामध्ये मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार झाले. यातील दोन महिला वयोवृद्ध आहेत. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेरामध्ये झालेल्या चित्रीकरणात दोन चोर कैद झाले आहेत. त्यात मोटरसायकल चालवणाऱ्या चोरट्याने हेल्मेट परिधान केले आहे, तर त्यांच्या मागे बसलेल्या चोरट्याने मास्क घातल्याचे स्पष्ट दिसत आहे. चोरी करणारी इराणी लोकांची टोळी असल्याचा पोलिसांचा संशय असून त्या दिशेने पोलीस तपास करत आहेत. पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. मात्र, शहरात चेन स्नॅचिंग करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातल्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. गणेशोत्सव काळामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडत असतात. अशावेळी पोलिसांसमोर चेन स्नॅचिंगच्या घटना थांबवण्याचे मोठे आव्हान आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details