नाशिक-कोविड रुग्णांची वाढती संख्या बघता मुंबई पुण्यासोबत नाशिक शहरात अतिरिक्त बेडची व्यवस्था असावी यासाठी क्रेडाईच्या माध्यमातून ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटरची निर्मिती केली आहे. क्रेडाईने तयार केलेले हे कोविड केअर सेंटर कोरोनाच्या आरोग्य सेवेचे एक आदर्श मॉडेल असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. क्रेडाई आणि नाशिक महापालिकेच्या माध्यमातून ठक्कर डोम येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन रविवारी पार पडले.
कोरोनाची वाढती संख्या बघता मुंबई पुण्यासोबत नाशिक शहरात अतिरिक्त बेडची व्यवस्था असावी यासाठी क्रेडाईच्या माध्यमातून ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटरची व्यवस्था केली आहे. क्रेडाईने तयार केलेले हे कोविड सेंटर अतिशय उत्कृष्ट बनवले आहे, असे पालकमंत्री भुजबळ यांनी म्हटले. कोविड केअर सेंटर बनविण्यासाठी चित्रकार तसेच परिश्रम घेतलेल्या सर्वांचे कार्य कौतुकास्पद आहे. रिक्रियेशन कक्षाच्या माध्यमातून विविध खेळ, पुस्तके , टीव्ही यासह मनोरंजनाची तसेच रुग्णांना योगा, मेडिटेशनसाठी व्यवस्था करण्यात आल्याने अतिशय उत्तम स्वरूपाचे कोविड केअर सेंटर निर्माण झाले आहे, असेही भुजबळ यांनी सांगितले.
हॉस्पिटलमधील बेड्स संपतील तेव्हा या कोविड केअर सेंटरचा वापर करण्यात येईल. बेडची संख्या कमी पडू नये यासाठी अतिरिक्त बेड्ससाठी ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटरची निर्मिती केली गेली आहे. रुग्णांची संख्या कमी कशी होईल यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तपासणी अधिक होत असल्याने रुग्णांचा आकडा वाढतो आहे. परंतु, कोरोनाचा प्रसार अधिक वाढू नये यासाठी तपासणी अधिक वाढवून रुग्णांचा शोध घेण्याचे काम सुरूच ठेवावे. कोरोना हे युद्ध असून सर्वांना एकत्र येऊन त्यासाठी लढण्याची आवश्यकता आहे. कोरोना होणारच नाही याची काळजी सर्वांना घ्यावी, घाबरून जाऊ नये, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.