नाशिक- शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल बोलून प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी देशातील शहिदांचा अपमान केला आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
हेमंत करकरेंबद्दल बोलून प्रज्ञा सिंह यांनी शहिदांचा अपमान केला - भुजबळ - साध्वी प्रज्ञा
प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी हेमंत करकरेंबद्दल केलेल वक्तव्य देशातील हुतात्मांचा अपमान करणारे आहे. त्याचा मी निषेध करत असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
पोलीस दलातील हेमंत करकरे हे प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी होते. ज्यांनी दहशतवाद्यांशी लढताना आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्याबद्दल अशाप्रकारे बोलणे चुकीचे आहे. मालेगाव ब्लास्टची चौकशी करताना करकरे यांनी धागेदोऱ्यांच्या आधारे कर्नल पुरोहीत आणि प्रज्ञा सिंह ठाकूर यांना पकडले. याचा अर्थ त्यांनी खरोखर बॉम्ब ब्लास्ट घडवला आहे.
हेमंत करकरे विचाराने पुरोगामी होते. प्रज्ञा सिंह ठाकूर भाजपमध्ये जाऊन पावन झाल्या आहेत. त्यांच्या वक्तव्याचा मी निषेध करत असल्याचेही भुजबळ यावेळी म्हणाले.