महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी शहरात 130 जवानांची तुकडी दाखल - जागतिक आरोग्य आणीबाणी

नाशिक शहर अद्यापही रेड झोनमध्ये असल्याने पोलिसांच्या मदतीसाठी केंद्रीय सुरक्षा बलाच्या (रॅपिड अ‌ॅक्शन फोर्स) तुकडीने जुने नाशिक परिसरात संचलन केले. यावेळी त्यांच्या मदतीसाठी आरएएफ, क्यूआरटी, एसआरपी, भद्रकाली व होमगार्ड आदींनी भद्रकाली, दूध बाजार, चौक मंडई, बागवान पुरा, आझाद चौक, चव्हाट, नानावली आदी परिसरात संचलन केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी शहरात 130 जवानांची तुकडी दाखल
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी शहरात 130 जवानांची तुकडी दाखल

By

Published : May 20, 2020, 11:20 AM IST

नाशिक -कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात चौथा लॉकडाऊन जारी करण्यात आला. राज्य पोलीस दल अहोरात्र कार्यरत असून काही पोलीस अधिकारी व कर्मचारीही कोरोनाबाधित झाले आहेत. राज्य पोलीस दलावरील भार कमी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे केंद्रीय सुरक्षा दलाची मागणी केली होती. याच अनुषंगाने 10 तुकड्या राज्यात दाखल झाल्या आहे. नाशिक शहरात 130 जवानाची तुकडी दाखल झाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी शहरात 130 जवानांची तुकडी दाखल

नाशिक शहर अद्यापही रेड झोनमध्ये असल्याने पोलिसांच्या मदतीसाठी केंद्रीय सुरक्षा बलाच्या (रॅपिड अ‌ॅक्शन फोर्स) तुकडीने जुने नाशिक परिसरात संचलन केले. यावेळी त्यांच्या मदतीसाठी आरएएफ, क्यूआरटी, एसआरपी, भद्रकाली व होमगार्ड आदींनी भद्रकाली, दूध बाजार, चौक मंडई, बागवान पुरा, आझाद चौक, चव्हाट, नानावली आदी परिसरात संचलन केले. यावेळी पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहायक पोलीस आयुक्त मंगलसिंह सूर्यवंशी आदी अधिकारी उपस्थित आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी शहरात 130 जवानांची तुकडी दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details