नाशिक -राज्यभर परतीच्या पावसाने थैमान घातले असून पीक नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले सांगितले आहे. ते निफाड तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागात पाहणी करण्यासाठी आले होते.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करताना हेहे वाचा - शरद पवारांना आरे तुरे करणाऱ्यांना जितेंद्र जोशीने सुनावले खडे बोल, पाहा व्हिडिओ
नुकसानग्रस्त भागात जावून सर्व अधिकारी पंचनामा करत आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळेल, असे आश्वासन आठवले यांनी यावेळी दिले. आठवले यांनी ओझर येथील शेतकरी विद्यानंद जाधव यांच्या द्राक्ष बागेची पाहणी केली व अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले. ओझर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी यावेळी गैरप्रकार घडवू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता.
हेही वाचा - 'महाराष्ट्राचे हित लक्षात घेता लवकरच सरकार स्थापन होईल'