महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकऱ्यांना दिलासा! केंद्र सरकारकडून मका खरेदीला १५ जुलैपर्यंत मुदतवाढ - छगन भुजबळ न्यूज

यंदा पीक पद्धतीतील बदलांमुळे मोठ्या प्रमाणावर मक्याचे पीक घेण्यात आले. त्यामुळे मक्याचे उत्पादन जास्त झाले आहे. केंद्र सरकारने दिलेले २.५० लाख क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल होते. त्यामुळ २३ जूनपासून राज्य सरकारला मका खरेदी बंद करावी लागली होती.

छगन भुजबळ
छगन भुजबळ

By

Published : Jun 24, 2020, 5:45 PM IST

नाशिक - मका उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत मका खरेदीला १५ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे सरकारी खऱेदी केंद्रावर पुन्हा मका खऱेदी सुरू होणार आहे. तर नऊ लाख क्विंटल मका खरेदी करण्याची परवानगी केंद्राने दिल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

यंदा पीक पद्धतीतील बदलांमुळे मोठ्या प्रमाणावर मक्याचे पीक घेण्यात आले. त्यामुळे मक्याचे उत्पादन जास्त झाले आहे. केंद्र सरकारने दिलेले २.५० लाख क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले होते. त्यामुळे २३ जूनपासून राज्य सरकारला मका खरेदी बंद करावी लागली होती. मात्र मोठ्या प्रमाणात मका शिल्लक राहिल्याने खरेदी केंद्रे सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी होती.

राज्य सरकारने केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाकडे मका खरेदीबाबत मागणी केली होती. तसेच छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारकडे संपर्क साधून राज्य सरकारचा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची विनंती केली होती.

केंद्र सरकारने प्रस्ताव मंजूर केल्याने राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण मका खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details