नाशिक - लासलगाव बाजार समितीत कांद्याचे भाव उतरल्याने शेकऱ्यांनी लिलाव बंद पाडला होता. तसेच काही ठिकाणी रास्ता रोको देखील करण्यात आला. आता दिंडोरीच्या खासदार भारती पवार यांनी दिल्लीत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गोयल यांना निवेदन दिले असून यामध्ये कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली आहे. संबंधित निर्यात सुरू करण्यासाठी अद्याप पंधरा दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
नाशिकच्या खासदार दिल्लीच्या भेटीला; पियुष गोयल यांचे पंधरा दिवसांत कांदा निर्यात बंदी उठवण्याचे आश्वासन - MP bharati pawar meets piyush goyal
कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्यासाठी दिंडोरीच्या भाजप खासदार भारती पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. यावेळी कांद्यावरील निर्यात बंदी येत्या पंधरा दिवसांत उठवणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्यासाठी दिंडोरीच्या भाजप खासदार भारती पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली.
येत्या पंधरा मार्चपर्यंत कांदा निर्यात सुरू करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी दिले आहे.