नाशिक- आज पहाटे भारतीय हवाई दलाने दहशतवादी संघटना जैश - ए - मोहम्मदच्या तळावर हल्ला केला. यात त्यांचे तीन तळ उद्धवस्त करण्यात हवाई दलाला यश आले. यावर देशभरातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत याचा जल्लोष केला.
जैशवरील हल्ल्याबद्दल नाशिकमध्ये जल्लोष, विद्यार्थ्यांनी केली जोरदार घोषणाबाजी - जैश
नाशिकमधील भोसला सैनिक महाविद्यालयातील विद्यार्थींनी या घटनेचा जल्लोष केला.
नाशिकमधील भोसला सैनिक महाविद्यालयातील विद्यार्थींनी या घटनेचा जल्लोष केला. पाकिस्तान मुर्दाबाद, भारतीय जवान जिंदाबाद अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी आपला आनंद व्यक्त केला. यावेळी विद्यार्थ्यांनी भारतीय हवाई दलाचे स्वागत केले.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलो वजनांचे बॉम्ब फेकल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. पाकिस्तान हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने केलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येते.