नाशिकमधील जल्लोष प्रसंगी दादा भुसे प्रतिक्रिया देताना नाशिकDada Bhuse:विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालाचं वाचन लाईव्ह बघितलं. सखोल निरीक्षण कायदे, लोकशाही आणि संख्याबळ यावर त्यांनी निकाल दिला. (Celebration in Nashik) जो शिंदेंनी निर्णय केला तो त्यांनी मान्य केला. एकनाथ शिंदे रात्रंदिवस कष्ट करत होते. तळागाळातील माणसाचं म्हणणं ऐकून घेणं ही त्यांची भूमिका आहे. ते स्वतःच्या शरीराची काळजी न करता काम करत आहेत. (MLA disqualification) प्रभू रामाचा आशीर्वाद, बाळासाहेब ठाकरे यांचा हा विजय आहे असं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं आहे.
नाशिकमध्ये आनंदोत्सव :विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूनं निकाल दिल्यानंतर नाशिकमध्ये शिंदे गटाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ढोल-ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांनी आनंद साजरा करत फटाके फोडले. मंत्री दादा भुसे यांच्यासह शिंदे गटातील आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. कायदा आणि नियमांचे अधिकार घेऊन राहुल नार्वेकर यांनी विवेचन केले. आता आणखी जोमाने काम करता येईल असं दादा भुसे म्हणाले.
संजय राऊत नारदमुनी :आदित्य ठाकरे यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते. माझ्या मनाविरुद्ध गेले तर चुकीचे आहे असं बोलणारेच चुकीचे. काळे झेंडे दाखविणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे. संजय राऊत यांचा लोकांना वैताग आला आहे. मीडियाच्या समोर येऊन चमकोगिरी करतात. नारदमुनीमुळे हे दिवस आले. राऊत यांनी कधी कुणाचं रेशन कार्ड काढलं का? दवाखान्यात कधी मदत केली. दुःखाच्या प्रसंगात कधी कुणाच्या घरी गेले का? आयत्या बिळावरचे हे नागोबा आहेत. आताचा सामना आणि मार्मिकमध्ये त्यांना क्लार्क म्हणून संधी होती. मी पातळी सोडून बोलत नाही. ते शिवसेना बळकवायला पाहात आहेत. मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत आहेत. दोन तीन वेळा संधी मिळाली. गद्दार म्हणायला अधिकार राहिला नाही. लोकशाहीत त्यांना कोर्टात जाण्याचा अधिकार आहे असं दादा भुसे यांनी म्हटलंय.
हेही वाचा:
- अखेर आमदार अपात्रतेचा महानिकाल लागला! शिंदेंसह ठाकरे गटाचे सर्व आमदार पात्र; खरी शिवसेनाही एकनाथ शिंदेंकडेच
- उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टात न्याय मिळेल, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर पवारांची प्रतिक्रिया
- नार्वेकरांच्या निकालावर काही म्हणाले लोकशाहीचा विजय, तर काही म्हणाले लोकशाहीचा गळा घोटला