नाशिक : नाशिकच्या पाथर्डी गावातील नवले मळ्यात 15 दिवसांपूर्वी नर बिबट्या जेरबंद झाला होता. त्यानंतरही वाडीचेरान मळ्यात बिबट्याची मादी व दोन बछड्यांच्या वावर होता. डेमसे मळ्यात रविवारी सायंकाळी उसाच्या शेतात बिबट्याचे तीन बछडे सापडले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बछड्यांना या ठिकाणी सुरक्षित ठेवत परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले (CCTV surveillance on Leopard) आहेत.
पिंजरा लावण्याची मागणी :नाशिकच्या वाडीचेरान, डेमसे व जाचक मळा या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली (CCTV surveillance of three leopard cubs) आहे. पाथर्डी गावातील मळे परिसरात काही दिवसांपूर्वी बिबट्यांची दहशत वाढली आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून नवले मळ्यात पिंजरा लावण्यात आला होता. याच पिंजऱ्यात 20 नोव्हेंबरला पहाटेच्या वेळी एक नर बिबट्या जेरबंद झाला. पाथर्डी गावातील स्थानिक नागरिकांना एक मादी व दोन बछड्यांचा वावर असल्याचे पहावयास मिळाले. वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी विभागाने या परिसरात पुन्हा पिंजरा लावावा अशी मागणी केली (leopard cubs in Pathardi area Nashik) आहे.