मालेगाव - मालेगावातील सेंट्रल चित्रपट गृहात 'करण अर्जुन' हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. हा शो सुरू असतांना शाहरुख आणि सलमानची एंट्री होताच काही चाहत्यांनी चित्रपट गृहात फाटके फोडण्यास सुरवात केली. त्यामुळे चित्रपट गृहात एकाच गोंधळ उडाला. या संदर्भात चित्रपट गृहाच्या व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून मालेगावच्या शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने चित्रपट गृह पूर्ववत सुरू झाले. मात्र नवीन चित्रपटाची निर्मिती नसल्याने मालेगाव मधील सेंट्रल चित्रपट गृहात जुने चित्रपट प्रदर्शित होतं आहे. अशात 'करण अर्जुन' हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. या शो दरम्यान शाहरुख आणि सलमानची एंट्री होताच काही तरुण चाहत्यांनी चित्रपट गृहात एकचं गोंधळ करत जोरदार फटाक्यांची आतिषबाजी केली. यामुळे चित्रपटगृहात धावपळ उडाली. हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांचा हा प्रकार तब्बल 15 मिनिटं सुरू होता. अशात काही प्रेक्षकांनी0 हा प्रकार मोबाइल मध्ये कैद करत हा व्हिडीओ व्हायरल केला.
पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या आदेशानतंर सेंट्रल चित्रपट गृहाचे व्यवस्थापक मोहम्मद सुलेमान यांच्या तक्रारी वरून अज्ञात संशयित व्यक्तींच्या विरोधात कलम 286 अंतर्गत व महाराष्ट्र पोलीस कायदा 112,117 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
10 वर्षात 27 वी घटना-