महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Fake Certificate : विद्यापीठाचे बनावट प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे (Yashwantrao Chavan Maharashtra Open University) बनावट प्रमाणपत्र (Fake Certificate) दिल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठात प्रवेश न घेताच त्यांना बनावट प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले आहे. याबाबत विद्यापीठाचे उपकुलसचिव मनोज घंटे यांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

YCM
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

By

Published : Aug 10, 2023, 9:10 PM IST

Updated : Aug 10, 2023, 9:53 PM IST

नाशिक :यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात (Yashwantrao Chavan Maharashtra Open University) प्रवेश न घेता चार जणांनी २० विद्यार्थ्यांना बनावट प्रमाणपत्र (Fake Certificate) दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुक्त विद्यापीठाचे उपकुलसचिव मनोज घंटे यांनी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

बनावट प्रमाणपत्र तयार : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीस विद्यार्थ्यांनी बॅचलर ऑफ सायन्स (Bachelor of Science), मेडिकल लॅब टेक्निशियन (Medical Lab Technician) आणि डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी (Diploma in Medical Laboratory Technology) अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला नव्हता. तरीदेखील चार संशयित आरोपींनी बनावट गुणपत्रिका, पदव्या, पदविका प्रमाणपत्र तयार केले.

बनावट प्रमाणपत्र रॅकेटचा पर्दाफाश : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून संशयित विद्यार्थ्यांनी पॅथॉलॉजी व्यवसायाची नोंदणी करण्यासाठी मुंबईतील महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलकडे कागदपत्रे सादर केली. तेव्हा हा प्रकार उघडकील आला. विद्यार्थ्यांनी सादर केलेले गुणपत्रिकांची पडताळणी करण्यासाठी ती मुक्त विद्यापीठाकडे सादर करण्यात आली. यावेळी विद्यापीठाच्या उत्तीर्ण यादीत संबंधित मुलांची नावे आढळली नाहीत. या पडताळणीत विद्यार्थ्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर हे रॅकेट समोर आले आहे.

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल : बनावट प्रमाणपत्र प्रकरणी चार जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक सोनवणे अहमदनगर, संजय नायर मनमाड, नागपूर सेंटर फॉर एज्युकेशनचे गौरव शिरस्कर, कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे रमेश होनामोरे यांच्यासह चार संशयितांविरुद्ध फसवणुकीचा नाशिक तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

प्रमाणपत्रधारकाविरुद्ध तक्रार दाखल :महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण विद्यापीठाने DMLT, B.Sc चे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी प्रमाणपत्रधारकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. 20 संशयितांची विद्यापीठाला महाराष्ट्र परिषदेकडून पडताळणीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या चौकशीत प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी संबंधित संशयितांना नोटिसा बजावल्याचे परीक्षा विभागाचे उपकुलसचिव मनोज घंटे यांनी सांगितले आहे. विद्यापीठाच्या आधुनिक पद्धतीमुळे प्रमाणपत्र, गुणपत्रिकेची सत्यता तत्काळ पडताळता येते. त्यामुळे या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याचे मुक्त विद्यापीठाचे मुक्त विद्यापीठाचे उपकुलसचिव मनोज घंटे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -

Mumbai University Election: मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या निवडणुकीचा बिगुल वाजला; 10 सप्टेंबरला होणार मतदान

Last Updated : Aug 10, 2023, 9:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details