महाराष्ट्र

maharashtra

#COVID19 : विनंतीनंतरही शाहीनबाग आंदोलन मागे न घेतल्याने गुन्हा दाखल

By

Published : Mar 19, 2020, 5:48 PM IST

प्रशासनाच्या विनंतीनंतरही आंदोलनाला स्थगिती न दिल्यामुळे पोलिसांनी आयोजक, जागा मालक व 70 महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाहीनबाग
शाहीनबाग

नाशिक- मालेगाव शहरात गेल्या 55 दिवसांपासून सुरू असलेले शाहीनबाग अंदोलन स्थगित करावे, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली होती. मात्र, आंदोलन सुरूच ठेवण्यात आले. त्यामुळे आयशा पोलिसांनी आयोजकांसह जागा मालक आणि 70 महिला आंदोलकाविरोधात भा.दं.वि.च्या कलम 188, 269 नुसार गुन्हा केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतरही आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे आयोजक हाजी युसूफ इलियास यांनी जाहिर केले.

कोरोनामुळे राज्यात विविध ठिकाणी जवामबंदी, आपातकालीन कायदा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार गर्दी न करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहे. पण, सीएए, एनपीआर व एनआरसी विरोधात आंदोलन सुरू होता. आंदोलनाला स्थगिती देण्याबाबत मालेगाव येथील प्रशासनाने विनंती केली होती. तरिही आंदोलन सुरु ठेवल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -चुलतीवर बसले पुतण्याचे प्रेम, काकाचा काढला काटा

ABOUT THE AUTHOR

...view details