नाशिक- जुने नाशिक भागातील सरस्वती परिसरातदोघांनीलाकडी दांडक्याने मारहाण करून हिरालाल प्रजापतीची हत्या केल्याची घटना सोमवारी (दि.28 सप्टें.) रात्री घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाकडी दांडक्याने मारहाण करीत एकाचा खून, दोन मारेकऱ्यांचा शोध सुरू - नाशिक खून बातमी
लाकडी दांडक्याने मारहाण करून दोघांनी एकाची हत्या केली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास पोलीस शिपाई सचिन आहिरे आणि भरत मल्ला हे जुने नाशिक भागात गस्तीवर असताना त्यांना काही नागरिकांनी सरस्वती लेन परिसरातील एका दुकानजवळ एका व्यक्तीला दोघेजण लाकडी दांड्याने मारहाण करत असल्याची माहिती दिली. तेव्हा गस्ती पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
मोबाइलमधील माहितीच्या आधारे मृताचे नाव हिरालाल प्रजापती असल्याचे स्पष्ट झाले. तो मूळचा नेपाळ येथील रहिवासी असून सध्या तो नाशिकमधील माडसांगवी परिसरात राहत असल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे.
हेही वाचा -नाशिक : अंड्यांच्या मागणीत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ; 'हे' आहे कारण