दिंडोरी (नाशिक) - तालुक्यातील निळवंडी येथील आश्विनी किरण पताडे या विवाहीतेने दोन दिवसांपूर्वी विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली होती. या प्रकरणी सासरच्या सहा जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दिंडोरी पोलीस ठाण्यात दाखल जाला आहे.
आश्विनीने दोन दिवसांपूर्वी विषारी द्रव प्राशन केले होते. तिला अत्यव्यस्त अवस्थेत नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंत तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी जोपर्यंत सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाख होत नाही तोपर्यंत अंत्यविधी न करण्याचा पवित्रा घेतला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आश्विनीच्या पार्थिवावर निळवंडी येथे तिच्या सासरच्या घरासमोरच अंत्यविधी करण्यात आला.