महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक : लासलगाव येथे बस चालकास कंटेनरने चिरडले - एस.पी.निकम

नाशिक - जिल्ह्यातील लासलगाव आगाराच्या लासलगाव ते तुळजापूर ही बस शनिवारी (दि. 30) सकाळी लासलगाव बस आगारात प्रवेश करत असताना कंटेनरने धडक दिली. त्यानंतर बस चालक बसच्या बाहेर येऊन पाहणी करताना घाबरलेल्या कंटेनर चालकाने वाहन तसेच पुढे नेले. यात बस चालकाचा कंटेनरखाली चिरडल्याने मृत्यू झाला

म

By

Published : Oct 30, 2021, 7:25 PM IST

नाशिक -जिल्ह्यातील लासलगाव आगाराच्या लासलगाव ते तुळजापूर ही बस शनिवारी (दि. 30) सकाळी लासलगाव बस आगारात प्रवेश करत असताना कंटेनर (क्र. एम एच 43 वाय 7463) ने धडक दिली. त्यानंतर बस चालक बसच्या बाहेर येऊन पाहणी करताना घाबरलेल्या कंटेनर चालकाने वाहन तसेच पुढे नेले. यात बस चालकाचा कंटेनरखाली चिरडल्याने मृत्यू झाला. एस.पी.निकम, असे त्या बसचालकाचे नाव आहे.

या घटनेनंतर संतप्त बस चालक-वाहक व लासलगाव बस आगारातील कर्मचारी संतप्त झाले होते. त्यामुळे लासलगाव आगारातील बससेवा काही काळ बंद होती. नाशिक येथून बसचालक एस.पी. निकम हे लासलगाव येथे आले. लासलगाव बस आगाराचे व्यवस्थापक समर्थ शेळके यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर बस स्थानकात घेत असताना कंटेनर चालकाने बसला धडक दिली. बसचे झालेले नुकसान पाहण्यासाठी निकम खाली उतरले असता घाबरलेल्या कंटेनरचालकाने वाहन तसेच पुढे दामटले. यामुळे बसचालक निकम कंटेनरखाली आले. मात्र, कंटेनरचालकाने वाहन न थांबवता दुकानांना धडका देत एका दुचाकीलाही धडक दिली. दुचाकीला धडकल्यानंतर कंटेनर थांबला. या अपघातात बसचालक निकम यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला होता. घटनेची माहिती मिळताच लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ हे इतर पोलीस कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. घटनेचा पंचनामा करत निकम यांचा मृतदेह शिवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाचे प्रभारी नियंत्रक मुकुंद कुंवर, विभागीय अधिकारी कैलास पाटील, सुरक्षा अधिकारी अजित भारती व कामगार अधिकारी शेख हे लासलगाव येथे दाखल झाले.

हे ही वाचा -मुंबई-आग्रा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details