नाशिक - राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी विशेष बस व्यवस्था सुरू केली आहे. ही विशेष बससेवा सुरू होताच राज्यात आणि राज्याबाहेर अडकलेले नागरिक बसस्थानकावर आपल्या गावी जाण्यासाठी गर्दी करत आहेत.
अखेरीस परप्रांतीयांची पायपीट थांबली; नाशकातून बसेसची सुविधा
नाशिकमधून काल मध्यरात्रीपासून शंभरहून अधिक बसेस सोडण्यात आल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे मुंबई पुणे या भागातून पायी जाणाऱ्या परप्रांतीय नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनीही महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत.
राज्यभरातील लाखो नागरिक आपल्या राज्यात जाण्यासाठी पायपीट करत निघाले होते. मात्र, या नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेऊन सरकारने या परप्रांतीय नागरिकांसाठी विशेष बसेस उपलब्ध करून देत या नागरिकांना त्यांच्या राज्याच्या हद्दीपर्यंत सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. याच निर्णयानंतर नाशिकमधून काल मध्यरात्रीपासून शंभरहून अधिक बसेस सोडण्यात आल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे मुंबई पुणे या भागातून पायी जाणाऱ्या परप्रांतीय नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनीही महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत.