नाशिक- पेठ-जळगाव बसला उमराळे नजीक अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला एका खड्ड्यात घुसली. या अपघातात ५०हून अधिक प्रवाशी होते. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना प्राथमिक उपचार करून मार्गस्थ करण्यात आले.
पेठ येथील उमराळेजवळ एसटी बसला अपघात, ५०हून अधिक प्रवाशी बचावले - nashik bus accident near umrale
उमराळे गावानजीक पोहोचल्यानंतर अचानक एक दुचाकीस्वार बससमोर आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाकडून बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्याशेजारी असलेल्या खड्ड्यात जाऊन अडकली.
![पेठ येथील उमराळेजवळ एसटी बसला अपघात, ५०हून अधिक प्रवाशी बचावले](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4993299-75-4993299-1573135156438.jpg)
मिळालेल्या माहितीनुसार, पेठ आगारची एमएच १४ बीटी ३६२७ क्रमांकाची बस सकाळी आगारातून निघाली. पेठ तालुक्यातील उमराळे गावानजीक पोहोचल्यानंतर अचानक एक दुचाकीस्वार बससमोर आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाकडून बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्याशेजारी असलेल्या खड्ड्यात जाऊन अडकली. या बसमध्ये ५०हून अधिक प्रवासी होते. अचानक रस्त्याच्या कडेला बस उतरल्याने बेसावध असलेल्या प्रवाशांच्या डोक्याला, हाताला किरकोळ दुखापत झाली. बस चालकाने स्थानिकांच्या मारहाणीपासून वाचवण्यासाठी अपघात स्थळावरून पळ काढला. दरम्यान संतप्त झालेल्या जमावाने राग अनावर झाल्यामुळे बसवर दगडफेक केली. या अपघातात किरकोळ जखमी असलेल्या प्रवाशांना प्राथमिक उपचार करून पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आले.