महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bullock Cart Race : ...अन् बैलगाडा शर्यत अर्ध्यावर थांबवली; आयोजकांवर कारवाई करणार

बैलगाडा शर्यतीला ( Bullock Cart Race ) सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली. नाशिकच्या ओझरमध्ये पहिल्यांदाच आज बैलगाडा शर्यतीचे ( Bullock Cart Race at Ojhar ) आयोजन करण्यात आले. मात्र या शर्यतीची परवानगी घेण्यात आली नसल्याने तसेच मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने ही शर्यंत अर्ध्यावर थांबवण्यात आली.

By

Published : Dec 25, 2021, 5:55 PM IST

Bullock Cart Race
बैलगाडा शर्यत

नाशिक -महाराष्ट्रात नुकतीच बैलगाडा शर्यतीला ( Bullock Cart Race ) सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली. नाशिकच्या ओझरमध्ये पहिल्यांदाच आज बैलगाडा शर्यतीचे ( Bullock Cart Race at Ojhar ) आयोजन करण्यात आले. मात्र या शर्यतीची परवानगी घेण्यात आली नसल्याने तसेच मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने ही शर्यंत अर्ध्यावर थांबवण्यात आली. तसेच बैलगाडा शर्यंतीचे आयोजन करणारे माजी आमदार अनिल कदम ( Anil Kadam ) यांच्यावर जिल्हा प्रशासनाने कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

...अन् बैलगाडा शर्यत अर्ध्यावर थांबवली

कोरोना नियम पायदळी -

शर्यंत पाहण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तर दुसरीकडे सांभाव्य ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता कोणतीही खबरदारी आयोजकांकडून घेण्यात आलेली नव्हती. न्यायालयाच्या सशर्त परवानगी नंतर बैलगाडा शर्यतीत भाग घेण्यासाठी स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या शर्यतीकडे लागून राहिले होते. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपाने या स्पर्धा अर्ध्यातच थांबवण्यात आल्या आहे. विजेत्या बैलगाडीला हजारो रुपयांचे बक्षीस देण्यात येणार होते. मात्र कोरोनाचे कारण देत स्पर्धा थांबवत असल्याचे आयोजन माजी आमदार अनिल कदम यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details