येवला (नाशिक): येवला तालुक्यातील राजापूर येथे लम्पीचा शिरकाव (Lumpy) झाल्याने शेतकरी संजय काळू जाधव (farmer sanjay jadhav) यांचा बैलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी होत आहे. (Bull died of lumpy disease)
वैद्यकीय अधिकाऱ्यांना फक्त राजापूरचाच कारभार द्यावा: राजापूर हे गाव मोठे असल्याने हजारोच्या संख्येने येथे बैलांची संख्या आहे. मात्र, एक दवाखाना आणि एक पशुवैद्यकीय अधिकारी आहे. त्यांना आणखी काही 22 गावांचा कारभार पाहावा लागत असल्याने राजापूर येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची कसरत होत असते. शासनाने राजापूर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना फक्त राजापूरचाच कारभार द्यावा, अशी मागणी येथील ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य यांनी केली आहे.
लम्पीचे लसीकरण: गावात अजून बऱ्याच ठिकाणी लम्पीचे लसीकरण (Vaccination of Lumpy) निम्म्याच्या वर बाकी आहे. उर्वरित लसीकरण लवकरच पूर्ण केले जाणार असल्याची माहिती येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे. तालुक्यामध्ये जवळपास 84 हजाराच्या आसपास जनावरे असून 100% लसीकरण झाले असल्याची माहिती वैद्यकीय पशु सर्वेक्षण अधिकारी यांनी दिली असली. तरी देखील आठ जनावरे लंपिंग आजाराने बाधित असून त्यातील एक जनावराचा मृत्यू झाला आहे.
खाजगी अथवा सरकारी पशुवैद्यकीय रुग्णालयाला संपर्क साधावा:अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सर्वत्र लसीकरण पूर्ण झाले असले तरी राजापूर गावामध्ये अनेक ठिकाणी लसीकरण पूर्ण झाले नसल्याची पशुपालक शेतकरी वर्गाकडून सांगण्यात येत आहे. लसीकरण करावे अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. लम्पी आजाराचा शिरकाव येवला तालुक्यात झाल्याने इतर गावातील पशुपालकांवर भीतीचे वातावरण पसरले असून तरी कोणत्याही प्रकारची लक्षणे (Lumpy's Symptoms) आढळल्यास त्वरित खाजगी अथवा सरकारी पशुवैद्यकीय रुग्णालयाला संपर्क साधावा जेणेकरून त्वरित त्या आजारावर उपचार करण्यात येतील अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.