नाशिकBuilder Suicide Case Nashik:मनोहर कारडा (Manohar Karda suicide case) यांनी आज (गुरुवारी) सायंकाळी रेल्वेचा पोल कि. लो. क्र. 182/10 जवळ संसारी गेट जवळ आत्महत्या केली. आत्महत्येमागे आर्थिक विवेचना, पोलिसांची भीती किंवा अन्य काही कारण आहे का, याचा लोहमार्ग पोलीस तपास करत आहे. नरेश कारडा यांच्या विरोधात फसवणुकीच्या तक्रारीनंतर आणखी 15 तक्रार अर्ज आले होते. त्या अर्जांमध्ये कारडा व त्यांच्या भावांचं नाव होतं. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कारडा कुटुंबीयांची मोठी बदनामी झाल्याने नरेश कारडा यांचे भाऊ मनोहर कारडा यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Builder suicide in Nashik)
फसवणुकीचे काय आहे प्रकरण?कारडा कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून संचालक नरेश कारडा यांनी अशोका मार्ग या परिसरात 2019 मध्ये बांधकाम प्रकल्प सुरू केला होता. या बांधकाम प्रकल्पातील दोन गाळ्यांसाठी लुणावत व त्यांचा मित्र सतीश कोठारी यांना दोन गाळे कारडा देणार होते. त्यासाठी कारडा यांनी तक्रारदारांकडून 1 कोटी 20 लाख रुपये घेतले होते. बुकिंग रक्कम घेऊनही बांधकाम प्रकल्पाला सुरुवात होत नसल्याने तक्रारदारांनी कारडा यांच्याकडे पैशांची मागणी केली; मात्र कारडांकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. तक्रारदारांनी या बांधकाम प्रकल्पाची माहिती घेतली असता, या ठिकाणी कोणताही बांधकाम प्रकल्प अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. त्यामुळे फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी कारडा यांच्या विरोधात मुंबई नाका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार, सोमवारी (ता. 30 ऑक्टोबर) रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करून बांधकाम व्यावसायिक व कारडा कन्स्ट्रक्शनचे नरेश कारडा यांना अटक करण्यात आली होती. यानंतर नरेश कारडा यांना न्यायालयात हजर केले असता 3 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.