महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

न्यायालयाने विवाहितेला पोटगी नकारली; राज्यातील पहिलाच निकाल

विवाहानंतर अवघ्या १९ दिवसात माहेरी निघून गेलेल्या विवाहितेला जळगाव सत्र न्यायालयाने झटका देत तिला पोटगी नाकारली आहे. विशेष म्हणजे या विवाहितेने आपल्या पतीच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत पोटगीसाठी न्यायालयात खटला दाखल केला होता. या प्रकरणी झालेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने निकाल नवऱयाच्या बाजूने दिला आहे.

प्रकरणाबद्दल माहिती देतांना नाशिकचे वकील धर्मेंद्र चव्हाण

By

Published : Jun 17, 2019, 7:40 PM IST

नाशिक- विवाहानंतर अवघ्या १९ दिवसात माहेरी निघून गेलेल्या विवाहितेला जळगाव सत्र न्यायालयाने झटका देत तिला पोटगी नाकारली आहे. विशेष म्हणजे या विवाहितेने आपल्या पतीच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत पोटगीसाठी न्यायालयात खटला दाखल केला होता. या प्रकरणी झालेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने निकाल नवऱयाच्या बाजूने दिला आहे.

प्रकरणाबद्दल माहिती देतांना नाशिकयेथील वकील धर्मेंद्र चव्हाण


गणेश नामक व्यक्तीचा विवाह जयश्री नामक महिलेसोबत झाला होता. अवघ्या १९ दिवसात विवाहितेने पती सोबत नांदण्यास नकार दिला. त्यानंतर पती सोबत वैवाहिक संबंध ठेवण्यास नकार देत विवाहिता माहेरी निघून गेली होती. पतीपासून घटस्फोट मिळाणे तसेच खर्चापोटी वीस लाखांची मागणी करत विवाहितेने पोटगीसाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. त्याचबरोबर तिने पतीसह सासरच्या लोकांवर पोलिसात गुन्हा देखील दाखल केला होता.


जळगाव सत्र न्यायालयातील न्यायाधीश रूपाली सिडनाळे यांच्या न्यायालयात हा खटला सुरू होता. पीडित गणेश च्या वतीने नाशिक येथील पुरुष हक्क समितीचे वकील धर्मेंद्र चव्हाण आणि वकील जयेश भावसार यांनी युक्तिवाद केला होता. महिला लग्न झाल्यानंतर अवघ्या १९ दिवसात माहेरी निघून गेली. या काळात तिच्यावर कौटुंबिक हिंसाचार होण्याचा प्रश्नच येत नासून हिंसाचार झाल्याचे सिद्ध होत नसल्याचे युक्तिवादात सांगितले गेले. यावर न्यायाधीश रूपाली सीडनाळे यांनी हा युक्तिवाद ग्राह्य धरत महिलेला पोटगी नाकारली आहे. विवाहितेला पोटगी नाकारल्याचा हा राज्यातील पहिलाच निकाल ठरला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details