येवला ( नाशिक ) -लग्नाचा दिवस हा प्रत्येकासाठी खास असतो. यादिवशी नवरदेवाचे सगळे थाट पुरवले जातात. एखाद्या नवरदेवाने लग्नाच्या दिवशी शेतातील काम केल्याचे तुम्ही ऐकलंय का, हो असं घडलयं. ते म्हणजे नाशिकच्या (Nashik ) येवलामधील थळकर वस्तीमध्ये. लग्न करून घरी आल्यानंतर गृह प्रवेशाआधी नवरदेवाने आपल्या गोठ्यातील गायीला चारा-पाणी देत तीचे दूध काढून वासरास पाजण्यास सोडले.
....त्याने आधी काढली गायीची धार, नंतर वधूसोबत केला गृह प्रवेश
नाशिकच्या (Nashik ) येवलामधील थळकर वस्तीमध्ये लग्न करून घरी आल्यानंतर गृह प्रवेशाआधी नवरदेवाने आपल्या गोठ्यातील गायीला चारा-पाणी देत तीचे दूध काढून वासरास पाजण्यास सोडले. शेतकऱ्याला आपले स्वतःचे लग्न असले तरीदेखील शेती व जनावरांकडे दुर्लक्ष करून चालत नाही, हेच यातून दिसून आले.
येवला शहराजवळील थळकर वस्ती येथील रामेश्वर थळकर यांचा शुभविवाह श्रीरामपूर येथे पूजा कुऱ्हे या वधू सोबत संपन्न झाला. मात्र, शुभविवाह झाल्यानंतर वधूची पाठवणी उशिराने झाली. यामुळे वऱ्हाडी मंडळींना घरी पोहचण्यास उशीर झाला. रामेश्वर यांच्या गोठ्यातील गाय हंबरडे फोडत होती. रामेश्वरच्या घरी गाय असल्याने गायीचे दूध काढण्याची वेळ सायंकाळी सात वाजता असते. ही गाय रामेश्वर यांच्याशिवाय दुसरे कोणालाही दूध काढू देत नाही. यावर रामेश्वर यांनी गृहप्रवेश थांबवला आणि आधी गायीचे दूध काढत वासराला गायीजवळ सोडलं. यानंतर रामेश्वर यांनी गृहप्रवेश केला. शेतकऱ्याला आपले स्वतःचे लग्न असले तरीदेखील शेती व जनावरांकडे दुर्लक्ष करून चालत नाही, हेच यातून दिसून आले.
पशुधनाची काळजी -
शेतकरी आपल्या शेतीसह आपल्या पशुधनाची काळजी घेताना दिसत असतो. घरी कोणते लग्नकार्य असो शुभ कार्य असो, अथवा कुठे बाहेरगावी जाणे असो, मात्र या पशुधनाची चारा पाण्याची सोय नेहमीच लावत असतो. अशाच प्रकारे येवल्यातील शेतकरी युवकाच्या घरी गाय असून त्याच्या हातानेच चारापाणी घेत असतात. मात्र, स्वतःचेच लग्न असल्याने लग्नाहुन त्याला उशीर झाल्याने अक्षरशा गायवासरू हंबरडा फोडत होते. लगेच या नवरदेवाने घरात जाण्याअगोदरच गाय व वासराला चारापाणी केले आणि गायीचे दुध काढून तिच्या वासरास दुध पाजण्यास सोडले. त्यानंतर रामेश्वरने पुढील गृह प्रवेश पूर्ण केला.