महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CORONA : लग्न समारंभात नवरदेव-नवरीने मास्क घालून पाहुण्यांचे केले स्वागत - लग्न समारंभ नाशिक

ओझर येथे पार पडलेल्या लग्न समारंभात चक्क नवरा-नवरीने मास्क घालून सर्व लग्नविधी पार पाडले. यावेळी आलेल्या पाहुण्यांना देखील हातावर सॅनिटाझर लावले जात होते. तसेच लग्नविधी झाल्यानंतर पाहुण्यांनी हात न मिळवता आवश्यक अंतर ठेवत नमस्कार करत वधू-वराला शुभेच्छा दिल्या.

लग्न समारंभात नवरदेव-नवरीने मास्क घालून पाहुण्यांचे केले स्वागत
लग्न समारंभात नवरदेव-नवरीने मास्क घालून पाहुण्यांचे केले स्वागत

By

Published : Mar 19, 2020, 12:31 PM IST

नाशिक - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यापासून संरक्षणासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. नाशकातही एक लग्नसमारंभादरम्यान वर-वधू दोघांनी तोंडावर मास्क घालून सर्व विधी पार पाडले. तसेच लग्नात आलेल्या पाहुण्यांनाही हातावर सॅनिटायझर देण्यात आले.

देशात हाहाकार घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरात कोरोनाचे रुग्ण मिळून आल्यानं प्रत्येकजण काळजी घेतांना दिसून येत आहे. नाशिकच्या ओझर येथील शिंदे लॉन्स येथे ढोकणे आणि कावळे कुटुंबात लग्न सोहळा पार पडला. वर राहुल आणि वधू भक्तीराणी ह्यांच्या लग्न समारंभात चक्क नवरा-नवरीने मास्क घालून सर्व लग्नविधी पार पाडले. यावेळी आलेल्या पाहुण्यांना देखील हातावर सॅनिटाझर लावले जात होते. तसेच लग्नविधी झाल्यानंतर पाहुण्यांनी हात न मिळवता आवश्यक अंतर ठेवत नमस्कार करत वधूवराला शुभेच्छा दिल्या. आपल्या आयुष्यात नवीन वळणावर या वधू-वराने टाकलेलं सावध पाऊल सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला.

ABOUT THE AUTHOR

...view details