मुंबई : मालेगाव 2008 च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील (2008 Malegaon blast case) लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची मुक्तता याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) फेटाळली आहे. कर्नल पुरोहित यांनी विशेष एनआयए कोर्टाने बॉम्बस्फोट प्रकरणात आपल्यावर आरोप निश्चित केल्याच्या विरोधात अपील म्हणून दाखल केले होते. नाशिकच्या मालेगावमध्ये 2008 ला झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी कर्नल प्रसाद पुरोहित आरोपी आहेत. त्यांना अटक करून नंतर जामिनावर मुक्त करण्यात आले होते. आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप काढून टाकण्यासाठी कर्नल पुरोहितने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. मात्र, पुरोहितच्या या घटनेतील एका पीडित व्यक्तीने याचिकेला आव्हान दिल्याने आरोपीच्या अडचणींमध्ये वाढ झाली (rejected acquittal plea of Prasad Purohit) आहे.
2008 Malegaon Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची याचिका न्यायालयाने फेटाळली - मुंबई उच्च न्यायालय
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील (2008 Malegaon blast case) लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची मुक्तता याचिका न्यायालयाने फेटाळली (Bombay High Court rejected acquittal plea) आहे. नाशिकच्या मालेगावमध्ये 2008 ला झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील कर्नल प्रसाद पुरोहित आरोपी आहेत. त्यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप काढून टाकण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली (rejected acquittal plea of Prasad Purohit) होती.
बॉम्ब स्फोटातील मृताच्या वडिलांनी घेतला आक्षेप - कर्नल पुरोहितवर युएपीए कायद्यांच्या अंतर्गत दाखल केलेला गुन्हा चुकीचा (Bombay High Court rejected acquittal plea) आहे. कुठलीही रितसर परवानगी न घेता त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याचा दावा कर्नल पुरोहितने याचिकेत केला होता. मात्र, कर्नल प्रसाद पुरोहितच्या या याचिकेला मालेगाव बॉम्बस्फोटातील मृत व्यक्तीच्या वडिलांनी विरोध (Prasad Purohit in 2008 Malegaon blast case) दर्शवला. निसार अहमद हाजी सय्यद बिलाल या व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये पुरोहितच्या याचिकेला आव्हान देणारी याचिका दाखल करण्याची परवानगी मागितली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस एस शिंदे व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. मुंबई उच्च न्यायालयाने निसार अहमद हाजी सय्यद बिलाल यांना याचिका दाखल करण्याची परवानगी दिली होती.
काय आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण :मालेगावमधील एका मशिदीत 29 सप्टेंबर 2008 ला बॉम्बस्फोट झाला (2008 Malegaon blast) होता. या घटनेत चारजणांचा मृत्यू झाला तर, 79 जण जखमी झाले होते. या प्रकरणी ८ जणांना यूएपीए कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. यात साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर, मेजर रमेश उपाध्याय, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, समीर कुलकर्णी, राकेश धावडे, सुधाकर द्विवेदी, दयानंद पांडे, सुधाकर चतुर्वेदी, प्रवीण टकलीकी या आरोपींना अटक करण्यात आलेली होती. याप्रकरणी आतापर्यंत शिवनारायण कलसंग्रह, शाम साहू, अजय राहिरकर जगदीश म्हात्रे, साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल प्रसाद पुरोहित यांना जामीन मिळालेला (acquittal plea of Lt Col Prasad Purohit) आहे.