महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

येवल्यातील बोकटे श्रीकाल भैरवनाथ यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द - बोकटे श्रीकाल भैरवनाथ यात्रा रद्द

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शासन, प्रशासन आणि आरोग्य विभागाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे राज्यात पुन्हा कडक निर्बंध लावले असून सर्व सार्वजनिक उत्सव रद्द करण्यात आले आहेत.

Bokte Shrikal Bhairavnath Yatra canceled
बोकटे श्रीकाल भैरवनाथ यात्रा रद्द

By

Published : May 2, 2021, 12:30 PM IST

नाशिक -दर चैत्रशुद्ध कालाष्टमीला येवला तालुक्यातील बोकटे येथे श्रीकाल भैरवनाथाची यात्रा असते. नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद या तीन जिल्ह्यातील भाविक बोकटे येथे येतात. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भवामुळे सलग दुसऱ्या वर्षी ही यात्रा रद्द करण्यात आली.

येवल्यातील बोकटे श्रीकाल भैरवनाथ यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली

तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा -

श्रीकाल भैरवनाथाची यात्रा ही तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा असते. सात दिवस हा यात्रौत्सव चालतो. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सलग दुसऱ्या वर्षी यात्रा महोत्सव रद्द करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. मंदिर परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. बोकटे, देवळाणे, दुगलगाव येथील कोरोना समितीने बोकटे यात्रा कालावधीत मंदिर परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे.

सात दिवस असणार पोलीस बंदोबस्त -

१ मेपासून ते ७ मेपर्यंत येवला तालुक्यातील बोकटे मंदिर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केल्यास पोलीस प्रशासनातर्फे कठोर कारवाई करण्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details