नाशिक - दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव धरणात अज्ञात व्यक्तीचा मृत्यदेह पाण्यावर तरगंत असल्याची माहिती वणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जाधव यांना मिळाली होती. यानंतर वणी पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांनी मृतदेह पाण्यातून काढून वणी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.
पुणेगाव धरणात आढळला युवकाचा मृतदेह - पुणेगाव धरण
वणी पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांनी मृतदेह पाण्यातून काढून वणी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.
![पुणेगाव धरणात आढळला युवकाचा मृतदेह पुणेगाव धरणात आढळला युवकाचा मृतदेह](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7057308-598-7057308-1588592096252.jpg)
पुणेगाव धरणात आढळला युवकाचा मृतदेह
सदर मृत युवक हा दिंडोरी तालुक्यातील दहीवी येथील रहिवासी असून रितेश मोतीराम ससाने (२३) असे त्याचे नाव आहे. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षिक प्रकाश जाधव यांनी सांगितले. पुढील तपास वणी पोलीस स्टेशनचे प्रविण पाडवी यांच्या मार्गदर्शनाने प्रकाश जाधव , व पोलीस कॉन्टेबल सुरेश चव्हाण करीत आहेत.