नाशिक- देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तर, यात महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. अशा परिस्थितीत रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. रक्ताचा हा तुटवडा भरून काढण्यासाठी येवल्यातील बुंदेलपुरा व्यायाम शाळेच्या तरुणांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
येवल्यात रक्तदान शिबिराचे आयोजन, गरजूंना किराणा वाटप - donate for needy
सध्या रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. रक्ताचा हा तुटवडा भरून काढण्यासाठी येवल्यातील बुंदेलपुरा व्यायाम शाळेच्या तरुणांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. तालीम संघाच्यावतीने पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
येवल्यात रक्तदान शिबिराचे आयोजन
सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना रक्तदान करण्याचा सल्ला दिला. तालीम संघाच्यावतीने पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. याशिवाय हातावर पोट असणाऱ्या अनेक कामगारांवर सध्या उपासमारीची वेळ आहे. अशा ३१ गरजू कुटुंबाना यावेळ किराणा सामानाचे वाटपही करण्यात आले.