नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी पार पडलेल्या जनता कर्फ्यूला नाशिककरांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. मात्र, सोमवारी संचारबंदी लागू असतानाही नागरिकांनी बाहेर पडण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी करून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
नाशिकच्या इतिहासात पहिल्यांदाच शहर १०० टक्के बंद राहिले होते. मात्र, सोमवारी काही दुकानदारांनी आपले दुकाने उघडल्याचे दिसून आले. सार्वजनिक बस वाहतूक सेवा बंद असली तरी रस्त्यावर रिक्षाने होणारी वाहतुक दिसून आली. जिल्ह्यात आत्तापर्यंत सुदैवाने एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही. तरीही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन खबरदारी घेत आहे.