नाशिक : वातावरणातील बदलांमुळे ( Weather Change In Nashik ) द्राक्ष पंढरी अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात द्राक्षांवर काळ्या बुरशीचे संकट आले ( Black Fungus On Grapes ) आहे. द्राक्ष घडांवर काळी बुरशी आली असून, मणी गळून पडणे व वाढ न होणे असे प्रकार समोर येत आहे. मण्यांवर काळ्या बुरशीचे डाग असल्याने निर्यातक्षम द्राक्षांना फटका बसण्याची चिन्हे असून, पडेल त्या भावात देशी बाजारपेठेत हे द्राक्ष विकण्याची वेळ उत्पादकांवर येऊ शकते. त्यामुळे उत्पादकांचे कोट्यावधीचे नूकसान होण्याची भिती व्यक्त केली जात ( Difficulties Increased Of Grape Growers ) आहे.
द्राक्षांवर पडली काळी बुरशी, उत्पादक शेतकरी संकटात : निर्यातक्षम द्राक्षांना फटका हाता तोंडाशी आलेला घास जाणार?
मागील काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल पहायला मिळत असून, ऐन थंडित अवकाळी पाऊस, त्यानंतर कमालीचा गारठा असा विचित्र प्रकार पहायला मिळत आहे. त्यामुळे द्राक्षांवर काळ्या बुरशीचा प्रभाव पहायला मिळत आहे. द्राक्ष शेती करतांना काळ्या बुरशीशी सामना शेतकऱ्याना करावा लागतोय. जिल्ह्यातील काही गावांतील द्राक्षांच्या घडांवर काळी बुरशी निर्माण व्हायला लागलीय. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभं ठाकले असून, द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावल्याचे चित्र आहे. काळ्या बुरशी बरोबरच तयार झालेल्या द्राक्षांच्या बागांवरती धुके पडत असल्याने मोठा अर्थिक तोटा होऊ शकतो, अशी भीती शेतकऱ्यांना जाणवू लागलीय. अगदी काही दिवसांवर द्राक्ष तोडणी करण्याची वेळ आलेली असतांना, काळी बुरशी दिसू लागल्याने हाता तोंडाशी आलेला घास जातो की काय अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात काहूर करतेय. नेमकं निर्यातक्षम द्राक्षांवर काळ्या बुरशीचे डाग दिसत आहे. त्यामुळे ही द्राक्ष निर्यातीसाठी नाकारली जाऊ शकते. परिणामी द्राक्ष उत्पादकांना कोट्यवधीचे नूकसान सोसावे लागू शकते.
अगोदरच संकटांची मालिका..
कोरोना संकटामुळे दोन वर्षांपासून मातीमोल बाजार भावाने द्राक्षांची विक्री करण्याची वेळ निफाड तालुक्यासह इतर गावातील द्राक्ष उत्पादकांवर आली होती. यंदा पाऊस चांगला झाल्याने द्राक्षबागांवर फळधारणा चांगली झाली असताना अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यातून झुंज देत द्राक्ष बाग वाचवल्या. तर यंदाच्या थंडीच्या हंगामात ढगाळ वातावरण आणि किमान तापमानाचा पारा हा निफाड तालुक्यात चार ते सहा अंश सेल्सियसवर गेला. शेकोट्या पेटवून धूर करत ऊब निर्माण करत द्राक्ष बाग वाचवल्या. मात्र, आता द्राक्ष घडांवर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे निर्यातक्षम द्राक्षांच्या बाजार भावावर परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून वेळोवेळी फवारणी केली. या हंगामात अनेक दिवस ढगाळ वातावरण असल्याने फवारणी जास्त करावी लागली. परिणामी मोठ्या प्रमाणात फवारणीसाठी खर्च झाला असल्याचे ब्राम्हणगाव येथील शेतकरी सुनील गवळी यानी सागितले आहे.