महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यंदा आषाढी वारी झालीच पाहिजे; भाजपा अध्यात्मिक आघाडीची मागणी

आषाढी एकादशीची वारी व्हावी, अशी वारकरी संप्रदायाची तीव्र इच्छा आहे. यामुळे निर्बंध घालून का असेना पण पायी वारी व्हायला हवी. यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळकाढूपणा न करता वारकऱ्यांसोबत त्वरित चर्चा करून आवश्यक नियमावली तयार करावी, आणि पायी वारीला परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपा अध्यात्मिक आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

By

Published : Jun 4, 2021, 1:26 PM IST

आषाढी एकादशीची पायी वारी
आषाढी एकादशीची पायी वारी

नाशिक-यावर्षी पायी वारीबाबत कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांनी वेळकाढूपणा न करता त्वरित वारकऱ्यांसोबत चर्चा करावी. आवश्यक नियमावली तयार करून पायी वारीला परवानगी द्यावी, अशी मागणी भाजप आध्यात्मिक आघाडीच्या वतीने तुषार भोसले यांनी केले आहे.

यंदा वारी होणारच...

संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख आकर्षणाचा विषय असलेली आणि वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी आषाढी एकादशीची पंढपूरची पायीवारी मागील वर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आली होती. मात्र यावर्षी पायी वारीमध्ये कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही. आषाढी एकादशीची वारी व्हावी, अशी वारकरी संप्रदायाची तीव्र इच्छा आहे. यामुळे निर्बंध घालून का असेना पण पायी वारी व्हायला हवी. यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळकाढूपणा न करता वारकऱ्यांसोबत त्वरित चर्चा करून आवश्यक नियमावली तयार करावी, आणि पायी वारीला परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपा अध्यात्मिक आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

यंदा आषाढीची पायी वारी झालीच पाहिजे

तडजोड स्वीकारणार नाही...

मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या झपाट्याने वाढत होता. त्यापार्श्वभूमीवर आषाढी वारीनिमित्ताने पंढरपुरात येणाऱ्या सर्वचा पालखी आणि दिंड्यांना परवानागी नाकारण्यात आली होती. तसेच मानाच्या पालख्यांची वारीची पंरपरा खंडीत होऊ नये म्हणून राज्य शासनाने मोजक्या प्रमुख वारकऱ्यांच्या उपस्थित बस, विमान अथवा खासगी वाहनांच्या माध्यमातून पंढरपुरात वारी पोहोच करण्याची परवानगी दिली होती. मात्र, गेल्यावर्षी वारकऱ्यांना घरातून विठूरायाला हात जोडावे लागले होते, त्यामुळे वारकऱ्यांचा हिरमोड झाला होता. यंदाही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे, सध्या राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, यंदाच्या आषाढी एकादशीला पुन्हा एकदा वारकऱ्यांचा हिरमोड होऊ नये आणि वारीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून, यंदा वारीबाबत कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही, अशी भूमिका भाजप आध्यात्मिक आघाडीच्या वतीने घेण्यात आली आहे. आता भाजपाच्या या मागणीला मुख्यमंत्री काय प्रतिसाद देणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details