महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाढीव वीज बिलाविरोधात दिंडोरीत भाजपचे आंदोलन - Nashik District Latest News

वाढीव वीजबिल कमी करावे या मागणीसाठी आज दिंडोरीमध्ये भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी वीजबिलांची होळी करून, सरकारचा निषेध केला.

BJP's agitation in Dindori
भाजपकडून वीजबिलांची होळी

By

Published : Nov 23, 2020, 8:43 PM IST

दिंडोरी ( नाशिक )-लॉकडाऊनच्या काळात विजेचा वापर कमी असताना देखील, सरासरी वीजबिलाच्या नावाखाली वीजवितरण कंपनीने जनतेला भरमसाठ वाढीव बिले पाठवली आहेत. याचा फटका सर्वसामान्य जनतेसह शेतकऱ्यांना बसला असून, ही बिले कशी भरायची असा प्रश्न जनतेला पडला आहे. याचा निषेध करण्यासाठी आज भाजपच्या वतीने दिंडोरीच्या महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी वीजबिलांची होळी करत सरकारचा निषेध केला. खासदार डॉ.भारती पवार यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.

भाजपकडून वीजबिलांची होळी

दरम्यान यावेळी भाजपच्या वतीने वाढीव वीजबिले कमी करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले. वीजबिल तातडीने कमी करावेत, ग्राहकांना बिलात सूट द्यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details