मनमाड(नाशिक)- भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष व रिपाईंतर्फे आज राज्यभर दुधाला भाव मिळावा यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.भाजप कार्यकर्त्यांनी नांदगांव व मनमाड शहरात देखील आंदोलन केले. शहरातील पुणे-इंदोर या राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
भाजपर्फे मनमाड नांदगावला दूध दरवाढीसाठी रास्ता रोको आंदोलन - भाजपचे दूध दरवाढ आंदोलन
दुधाला भाव वाढवून मिळावा भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपच्या वतीने राज्यभर आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नांदगाव आणि मनमाडमध्येही रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
दुधाला जास्त भाव मिळावा यासाठी भाजप आक्रमक झाला आहे. मनमाड भाजप मंडल तर्फे पुणे-इंदूर या महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष व रिपाइंच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. सुमारे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
नांदगाव व मनमाड शहरात आज रास्ता रोको करत दुधाचा टँकर अडवण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जयकुमार फुळवणी, जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश इंगळे, सचिन दराडे, नारायण पवार, एकनाथ बोडके, नितीन परदेशी, सुनील पगारे, डॉ. सागर कोल्हे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.